मोफत गणवेश योजनेचा लाभ स्थानिक पातळीवरून देण्याचा विचार – मंत्री दीपक केसरकर

मुंबई :-  सन 2023-24 या शैक्षणिक वर्षांमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा लाभ शाळा व्यवस्थापन समितीद्वारे देण्यात येत आहे. मात्र शालेय गणवेश उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्थानिक पातळीवर महिला बचत गटांना देण्याचा सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत सांगितले.

शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेश वाटपाचे काम स्थानिक पातळीवर करण्याबाबतचा प्रश्न सदस्य सर्वश्री अनिल देशमुख, आशिष शेलार यांनी उपस्थित केला होता.

मंत्री दीपक केसरकर म्हणाले, महिला बचतगटांना गणवेश तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेश वाटपाचे काम स्थानिक पातळीवर देण्याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवैध गुटखा आणि तत्सम पदार्थांची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई होणार - मंत्री धर्मरावबाबा आत्राम

Sat Jul 22 , 2023
मुंबई :- राज्यात गुटखा, पान मसाला आणि तत्सम प्रतिबंधित पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी विधानसभेत सांगितले. राज्यात तंबाखू मिश्रित पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबतचा प्रश्न सदस्य आशिष शेलार, अतुल भातखळकर, योगेश सागर यांनी उपस्थित केला होता. मंत्री आत्राम म्हणाले की, गुटखा,पान मसाला व इतर तत्सम प्रतिबंधित पदार्थांची वाहतूक करणाऱ्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!