नद्यांचे संगोपन गरजेचे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई :- “नद्यांचे संगोपन करणे गरजेचे असून गोदावरी या मराठी चित्रपटातून नदीसोबतच आपलं नातं पुनरूज्जीवीत करता येईल”, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण सभागृहात ‘गोदावरी’ चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिओ स्टुडिओचे कन्टेन्ट हेड निखिल साने, अभिनेता जितेंद्र जोशी , दिग्दर्शक निखिल महाजन, गायक राहुल देशपांडे यांच्यासह चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ, संबंधित मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘गोदावरी ही आपल्या करीता जीवनदायीनी आहे. या नदीशी नातं सांगणारी गोष्ट गोदावरी चित्रपटात आहे. सभ्यता, संस्कृती यांच्यासोबत नदीचा थेट संबंध आहे. आपल्या वेदांमध्ये, संस्कृतीतही नद्यांचे महात्म्य सांगितलेले आहे. पण कालौघात औद्योगिक विकास प्रक्रियेत नद्यांची शुद्धता धोक्यात आली आहे. ती शुद्धता जपण्यासाठी नद्यांचे संगोपन करणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नदी शुद्धीकरणासाठी अमृत योजना सुरू केली आहे. त्यामध्ये गोदावरी नदीचा समावेश असल्याचे सांगून  फडणवीस म्हणाले की, गोदावरीचे आपल्या सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाचे स्थान असून या चित्रपटात गोदावरी या नदीभोवतीच्या एका व्यक्तीची कथा सादर केली आहे. मराठी चित्रपटांना आशयघन परंपरा आहे. ती कायम ठेवत या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावलेला आहे’. प्रेक्षकांना ही गोष्ट आपली वाटेल. हा चित्रपट वेगळा ठसा उमटवेल असे सांगून देवेंद्र फडणवीस यांनी पुरस्कारांबद्दल कलाकारांचे अभिनंदन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणांतर्गत महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर मंजूर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधानांचे आभार

Tue Nov 1 , 2022
मुंबई :- राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणांतर्गत महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर मंजूर केल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसी येथे हे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर साकारले जाणार असून, त्या माध्यमातून सुमारे 2000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. हे क्लस्टर तयार करण्याची जबाबदारी प्रकल्प अंमलबजावणी संस्था म्हणून एमआयडीसी ची असणार आहे. 297.11 एकर जागेवर हे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com