संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नागपूर जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागेवर शिक्षण सेवकांची नेमणूक करण्यासाठी जिल्हा खनिज विकास निधी मधुन निधी उपलब्ध करून देण्याबाबत कामठी तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी नागपुर यांना कांग्रेसच्या वतीने सामूहिक निवेदन सादर करण्यात आले.
जो पर्यंत महा.शासनातर्फ़े नवीन शिक्षकांची भरती होत नाही तोपर्यंत नागपुर ज़िल्हयात शिक्षण सेवकांची तात्काळ नेमणूक करने अंत्यंत गरजेचे आहे. नागपूर जिल्हयातील ग्रामीण भागातील गोर गरीब शेतक़ऱ्याच्या शेत मजुरांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. यासाठी शिक्षण सेवकांची नियुक्ती अत्यंत गरजेची आहे. करीता आज 7 जुलै ला कामठी तालुका युवक काँग्रेस तर्फे तहसिलदार कामठी यांना तालुका युवक काँग्रेस चे अध्यक्ष निखिल फलके यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले
या वेळी प्रामुख्याने जि.प सदस्य दिनेश ढोले, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव अनुराग भोयर, कामठी बाजार समिती सभापती- अनिकेत शहाणे कामठी तालुका सेवादल अध्यक्ष किशोर धांडे, प्रशांत काळे, कामठी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष सलामत अली,खैरी चे उपसरपंच राम ठाकरे, बेनिराम विघे,उपसरपंच टेमसना रामजी खडसे, तूषार ढेंग्रे, वसंता हेटे, राजु चंडी मेश्राम व युवक काँग्रेस चे कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.