रमानगर उडाणपुल बांधकामाच्या पूर्णत्वाच्या मागणीसाठी कामठी तहसील कार्यालयावर कांग्रेसचा धडक मोर्चा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- केंद्र शासनाच्या वतीने मंजूर केलेल्या विकासकामातून कामठी मतदार संघातील रमानगर उडानपूल बांधकामासाठी 65 कोटी 29 लक्ष रुपयाच्या मंजूर निधीतून उडानपूल बांधकाम सुरू असून बांधकाम पूर्ण करून देण्याच्या निर्देशित सहा वर्षांची मुदत संपूनही संबंधित कंत्राटदारांच्या मनमणीपणामुळे काम पूर्णत्वास आले नसून उलट कामात संथपणा सुरू आहे.तर दुसरीकडे आजनी रेल्वे फाटक बंद करून भुयार पुलिया चे काम सुरू आहे. कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागातील नागरिकांसाठी तसेच या मार्गाने वाहतूक करणाऱ्या जड वाहतुकीसह शालेय महाविद्यालयीन बसेस,शेतकऱ्यांचे वाहने आदींना गैरसोय होत असून संबंधित कंत्राटदाराच्या मनमणीपणाचा सर्वाना मानसिक त्रास सहन करावा लागत असून रमानगर रेल्वे ओव्हरब्रिज तसेच आजनी भुयार पुलिया चे बांधकाम करणाऱ्याकडून वेठीस आणल्याने संतप्त नागरिकांच्या वतीने ही गैरसोय टाळून नागरिकांच्या सोयीसाठी रमानगर उडाण पुलाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्णत्वास आणावे तसेच आजनी भुयारी मार्ग लवकरात लवकर सुरू करण्यात यावा या मागणीसाठी आज कांग्रेस च्या वतीने माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या नेतृत्वात कामठी तहसील कार्यालयावर भव्य जनाक्रोश धडक मोर्चा काढण्यात आला.

कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या रमानगर उडानपूल बांधकाम सण 2020 पर्यंत करून देणे हे नियोजित होते मात्र दरम्यान आलेल्या कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे काम थंडबसत्यात असल्याने पुनश्च या कामाला 31 डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली ही मुदतवाढ संपूनही बांधकाम पूर्णत्वास येईना अशी अवस्था आहे, बांधकामाच्या नावाखाली तसेच तिसरी रेल्वे लाईन टाकण्याच्या नावाखाली सर्वेक्षणच्या नावावर रमानगर रेल्वे फाटक मार्ग बहुधा तासनतास बंद असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद असते तसेच आजनी भुयार पुलिया बांधकाम प्रगतीपथावर असल्याने या दोन्ही मार्गाने जड वाहने तसेच शालेय ,महाविद्यलयीन बस वाहतुकीला आळा बसला आहे.ज्यामुळे वाहतुकदारासह शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नाहक त्रास भोगावा लागत आहे. नाइलाजास्तव या दोन्ही मार्गाने मार्गक्रमण करणाऱ्या शालेय महाविद्यालयीन बस वाहतूकदार तसेच इतर जड वाहतूकदारांना पावंनगाव मार्गे प्रवास करावा लागतो बरेचदा या मार्गावर विद्यार्थ्यांना वेठीस धरले जाते तेव्हा मागील सात वर्षांपासून रमानगर रेल्वे उडानपुल बांधकाम संत गतीने सुरू असल्याने या मार्गाहून मार्गक्रमण करणाऱ्या शालेय विद्यार्थी तसेच शहर तसेच ग्रामीण भागातील नागरिकाना नाहक वेठीस धरले जाते।याला जवाबदार असलेल्या कंत्राटदाराविरुध्द प्रशासकीय दखल घेऊन कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा,अर्धवट रखडलेल्या आजनी पुलाचे बांधकाम पूर्णत्वास आणूंन लवकरात लवकर पूलिया सुरू करणे तसेच ड्रॅगन पॅलेस भुयार पुलिया मार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याने बराच वेळ पर्यंत वाहतूक ठप्प राहते दरम्यान नागरिकात आपापसात वाद होतात तर विद्यार्थ्यांना परीक्षेला उशीर होतो यासाठी या मार्गावर वाहतूक पोलिसांची नेमणूक करणे आदी नागरी हितार्थ आज माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या नेतृत्वात कांग्रेस तर्फे कामठी तहसील कार्यालयात भव्य जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला.दरम्यान एसडीओ गोसावी तसेच तहसीलदार अक्षय पोयाम यांना सामूहिक निवेदन देत सदर समस्या लवकरात लवकर मार्गी लावून रमानगर उडाणपूल तसेच आजनी भुयार पुलिया लोकांच्या सेवेत लवकारात लवकर सुरू करण्यात यावे अशी मागणी करीत आता आश्वासनावर समाधान व्यक्त करणार नसून मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला.

याप्रसंगी मोर्च्यांत जी प सदस्य दिनेश ढोले, कामठी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अनिकेत शहाणे, उपसभापती कुणाल इटकेलवार,कामठी पंचायत समिती सभापती दिशा चनकापुरे,कामठी पंचायत समिती सदस्य सुमेध रंगारी, सोनू कुतथे,येरखेडा ग्रा प सरपंच सरिता रंगारी,कांग्रेस पदाधिकारी इर्शाद शेख, नीरज लोणारे, काशिनाथ प्रधान, किशोर धांडे, सलामत अली,आशिष मेश्राम,कमलाकर मोहोड,आरिफ कुरेशी, नाजीम कुरेशी,राजकुमार गेडाम,प्रमोद खोब्रागडे,मनोज कुतथे, धर्मराज आहाके,राजभाई बनसिंगे, मो सुलतान, हेमराज गोरले, इशरत खान,अब्दुल सलाम अन्सारी,आकाश भोकरे, तुषार दावाणी,राहुल कनोजिया,ओमप्रकाश कुरील,अजाबराव उईके, पंकज रडके,ज्योती कारेमोरे आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कोस्टल रोडच्या परिसरात जागतिक दर्जाचे पार्क उभे करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Thu Mar 7 , 2024
– कोस्टल रोड, वरळी, दादर परिसरातील रस्ता काँक्रीटीकरणाची पाहणी मुंबई :- धर्मवीर संभाजी महाराज मुंबई सागरी रस्ता म्हणजेच मुंबई कोस्टल रोडच्या परिसरात ३२० एकर जागतिक दर्जाचे पार्क उभे केले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. सागरी किनारा रस्त्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळी, दादर परिसरातील सिमेंट रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. पावसाळ्यापूर्वी ही सर्व कामे वेळेत पूर्ण व्हावीत, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com