संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- सुरतच्या कोर्टाकडून कांग्रेसचे नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सूनवल्यानंतर लोकसभा सचिवालयाने खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ कामठी शहर कांग्रेस रस्त्यावर उतरली असून या कृतीचा निषेध करीत आज 25 मार्च ला कामठी शहर कांग्रेस कमिटी कार्यालय समोर शहराध्यक्ष कृष्णा यादव यांच्या नेतृत्वात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
गुजरात निवडणुकीच्या दरम्यान राहुल गांधी यांनी केलेल्या मोदी विरोधी वक्तव्याचे प्रकरणं न्यायप्रविष्ट होते.या प्रकरणाचा 23 मार्च रोजी गुरुवारी निकाल लागला.माणहानीच्या या प्रकरणात न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवीत दोन वर्षांची शिक्षा सुनावली. ज्यामुळे कांग्रेस पक्षात असंतोष पसरला असून भाजप सरकारचा संपूर्ण देशात निषेध व्यक्त केल्या जात आहे.त्यानुसार आज कामठी शहर कांग्रेसच्या वतीने कांग्रेस कमिटी कार्यालय समोर कांग्रेस शहराध्यक्ष कृष्णा यादव यांच्या नेतृत्वात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला.
याप्रसंगी कामठी शहर कांग्रेस कार्याध्यक्ष मो आबीद ताजी, युवक कांग्रेस चे पदाधिकारी मो इर्शाद शेख, राजकुमार गेडाम, अब्दुल सलाम,सोहेल अंजुम,आशिष मसराम आदी उपस्थित होते.