संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-ई रिकॉर्ड संगणिकृत करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर
कामठी ता प्र 9:-महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या डिजिटल स्वाक्षरी संगणिकृत महसूल विभागाचे अधिकार अभिलेख, मालमत्ता पत्रक, फेरफार पंजी , ई रिकॉर्ड ची सुविधा नागपूर जिल्ह्यात उपलब्ध नसल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने सदर दस्तावेज सुविधाचा लाभ घेता येत नसल्याने नागपूर जिल्ह्यात ई रिकॉर्ड सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ , महाराष्ट्र चे कामठी तालुका संघटक अजय शेंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन सादर केले आहे.
महाराष्ट्रातील महसूल विभागाने लोकाना तलाठी व तहसील कार्यालयात न जाता आपले सरकार ची सोय करून दिली आहे मात्र ऑनलाईनचा वापर केला असता नागरिकांना संगणिकृत अभिलेख तपासणी व डिजिटल स्वाक्षरी प्रत सहजपणे उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांची कुचंबणा होत आहे.महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ई रिकॉर्ड ची सुविधा मिळत आहे मात्र नागपूर जिल्ह्यातील ई रिकॉर्ड संगणिकृत नसल्यामुळे ऑनलाईन ला नागपूर जिल्हा दिसून येत नाही.नागपूर जिल्ह्यातील तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांनी कामामध्ये हयगय केल्यामुळे ई रिकॉर्ड संगणिकृत होऊ शकला नाही त्यामुळे नागरिकांना संगणिकृत रिकॉर्ड उपलब्ध होऊ शकत नाही तरी आपण सदर यंत्रणेकडून रिकॉर्ड अद्यावत करून सामान्य जनतेला संगणिकृत रिकॉर्ड उपलब्ध करून द्यावे अशी मागणी अजय शेंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदित केली आहे.
नागपूर जिल्ह्यातील ई रिकॉर्ड संगणिकृत करा-अजय शेंडे
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com