मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, भारतातील सर्वात लांब सागरी सेतू, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) बद्दल आनंद व्यक्त केला आहे. ह्या अद्ययावत पायाभूत सुविधांमुळे देशातील नागरिकांचे जीवनमान अधिक सुखकर होण्यास पाठबळ मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एमटीएचएल ची गुणवैशिष्ट्ये सांगणाऱ्या ट्वीटला प्रतिसाद देत, पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे;
“ह्या अद्ययावत तंत्रज्ञानामुळे, लोकांचे जीवनमान अधिक सुखकर होण्यास पाठबळ मिळेल.”