गच्चीवरील मातीविरहित बाग नागपूर समूह व हिरवाई विदर्भाची ह्या समूहातर्फे आयोजित कंपोस्ट कार्यशाळा व प्रदर्शन.

नागपूर :- आज दिनांक 11 सप्टेंबर 2022 ला नक्षत्र सेलेब्रेशन हाॅल. प्रतापनगर नागपूर. येथे उल्लेखित ग्रुप द्वारा कंपोस्ट कार्यशाळा व पर्यावरण व गार्डन संबंधित प्रदर्शनीचे उद्घाटन  राम जोशी (अति. आयुक्त, म.न.पा.नागपूर) ह्यांचा हस्ते  दीपप्रज्वलनाने  झाले, त्या सोबत प्रमुख अतिथी म्हणून सी.ए. आरती कुळकर्णी व प्रशांत चौधरी, अध्यक्ष, एस.ई.रेल्वे , काॅ. हाॅ सोसा. व आमच्या जेष्ट सभासद अंजली पडळकर पण उपस्थित होत्या.

सर्व प्रथम मान्यवरांचा परिचय झाला. त्यानंतर  राम जोशी  आपल्या उदबोधनप्रद भाषणातून ग्रुपच्या उत्कृष्ट कार्याची प्रशंसा केली, आज घरोघरी कंपोस्ट व पर्यावरण पूरक वातावरणासाठी इकोबिक्स ची संकल्पना सर्वान पर्यंत पोहचणे किती गरजेच आहे व त्यासाठी  गच्चीवरील मातीविरहित बाग नागपूर समूह व हिरवाई विदर्भाची हा फेसबुक समूह  हा ग्रुप कार्यशाळा व प्रदर्शनाच्या माध्यमातून हे कार्य अतिशय उत्तम करत आहे, तसेच  नागपूर महानगरपालिका  पण ह्या कार्यात सक्रीय सहभाग घेवून कार्य करत आहे, त्यामुळे धंटा गाडीत येण्यार्या कचर्यात ओल्याकचर्याचे प्रमाण बरेच कमी झाले आहे बरेच लोक त्याबद्दल जागृत झाले आहे, आणी अनेक जण घरी कंपोस्ट खत पण बनवतात, तरीही आलेल्या ओल्याकचर्याचे महानगरपालिका कंपोस्ट प्रकल्प राबवीतत आहे, व कंपोस्टची जनजाग्रती व्हावी म्हणून  कंपोस्ट प्रतियोगिता पण म.न पा. नागपूर तर्फे नुकतीच आयोजित करण्यात आली आणी त्याला पण नागपूरकरांनी भरघोस प्रतिसाद दिला, ह्याचा पण जोशी नी आवर्जून उल्लेख केला. मनपा तर स्मशान घाटावर होणार्या प्रदुषण रोखण्यासाठी इकोबिट हा प्रकल्प पण राबवत आहे, ह्याची माहिती पण आम्हाला त्यांचा कडून मिळाली. धन्यवाद  त्यानंतर सी.ए. आरती कुळकर्णी पण ग्रुप च्या कार्याची प्रंशसा करत थोडक्यात छान मार्गदर्शन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी पोलिसांनी घेतला गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत नाचण्याचा मनमुराद आनंद

Mon Sep 12 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी, ता. प्र.12 :- सद्रक्षणाय -खलनिग्रहनाय हे ब्रीद बाळगून जनसामान्यांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिसांवर कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची मुख्य जवाबदारी असते.त्यानुसार प्रत्येक सणोत्सवदरम्यान उत्सव योग्यरीत्या पार पाडण्यासाठी पोलिसांवर जवाबदारी असते दरम्यान पोलिसाना कोणतेच सण उत्सव साजरे करण्याचा आनंद घेता येत नसतो .प्रत्येकवेळी कोणत्याही उत्सवाच्या वेळी पोलिसांची सुट्टी देखील रद्द होत त्यांना बंदोबस्तावर हजर राहावे लागते मात्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com