लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई :- पुणे जिल्ह्यातील लोहगाव परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने लोहगाव येथील सहा एकर जागेत १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व निवासस्थानांचे बांधकाम करण्यात येत आहे. सद्यस्थितीत ९० टक्के बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित कामे जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

पुणे जिल्ह्याच्या लोहगाव (ता. हवेली) येथील उपजिल्हा रुग्णालय व निवासस्थान बांधकामाचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आज घेतला. बैठकीस आमदार सुनील टिंगरे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, पुण्याचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, उपजिल्हा रुग्णालयाचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. या रुग्णालयाच्या माध्यमातून लोहगाव परिसरातील जनतेला आरोग्यसेवा पुरविण्यात येणार आहेत. रुग्णालयाचे बांधकाम, आतील साधनसामुग्री इतर सोयीसुविधा, रुग्णांवर उपचारासाठी साधने, आरोग्य यंत्रणा, आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करण्याबाबतची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात यावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्रात जनसंवाद पदयात्रा

Wed Sep 6 , 2023
नागपूर :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या निर्देशानुसार राज्यातल्या प्रत्येक जिल्हयामध्ये प्रत्येक विधानसभा क्षेत्रात महाजनसंवाद पदयात्रा शुरू करण्यात आल्या. आज दि. 06.09.2023 रोजी पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्रातील आंबेडकर चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला माल्यार्पण करून नागपूर शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष तथा आमदार विकास ठाकरे, नागपूर दिमाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार यांच्या नेतृत्वात तसेच मनपाचे माजी विरोधी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com