नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे उद्यान अधिक्षक व उद्यान पर्यवेक्षक यांच्या विरोधात धंतोली पोलीस स्टेशनमध्ये दाखल तक्रार चुकीची असून तत्थ्यहिन आहे.
अजनी चौकातील क्लॉक टॉवर परिसरातील सौंदर्यीकरण कार्यादरम्यान हेरिटेज झाडे कापण्यात आल्याची तक्रारदार सचिन खोब्रागडे यांनी धंतोली पोलीस स्टेशनमध्ये केली. या तक्रारीच्या अनुषंगाने मनपाचे उद्यान अधिक्षक अमोल चौरपगार व उद्यान पर्यवेक्षक अनुप बांडेबुचे यांच्यावर धंतोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
या संदर्भात उद्यान अधिक्षक अमोल चौरपगार यांनी सांगितले की, उपरोक्त तक्रार ही चुकीची आहे. सदर परिसरातील कुठलेही हेरिटेज झाड कापलेले नाही. झाडांच्या फांदया कापल्या असून त्या रितसर परवानगी घेऊनच कापण्यात आलेल्या आहेत. धंतोली पोलीस स्टेशनव्दारे तक्रार दाखल करतांना परिसरातील झाडे हेरिटेज आहेत अथवा नाही याची शाहनिशा करणे गरजेचे होते. मात्र त्यांनी अशी कुठलिही शहानिशा न करता चुकीची तक्रार दाखल केली आहे.
@ फाईल फोटो