नागपूर :- पोलीस आयुक्त, नागपूर शहर डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी पोलीस ठाणे ईमामवाडा हद्दीतील व्ही आर मॉल येथे आयोजीत नशा विरोधी अभियान कार्यक्रमात तेथे उपस्थित असलेले शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व जनतेला मादक पदार्थामुळे शरीरावर व समाजावर होणारे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन केले, व यासंबंधाने फ्लॅश माँब व हस्ताक्षर अभियानाला सुरुवात करून समाजाला नशामुक्त करण्याची वचनबध्दता व्यक्त केली.
पोलीस आयुक्त यांनी सामुदायीक सहभागाचे महत्व सांगुन हे अभियान एक सामुहीक लडाई आहे असे सांगुन नशेच्या दुरूपयोग बाबत माहिती दिली. सदर कार्यक्रमाकरीता प्रामुख्याने सदाबाई रायसोनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उर्जावान, फ्लॅश माँब सादरीकरण करून उपस्थित लोकांचे लक्ष वेधले.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रसिध्द पॉड कास्टल सोनाली नक्षीने यांनी केले. सदर कार्यक्रमास रविन्द्रकुमार सिंगल पोलीस आयुक्त नागपूर शहर यांचेसह रश्मीता राव पोलीस उप आयुक्त परि क. ४. कमलाकर गड्डीमे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे ईमामवाडा, गजानन गुल्हाने, पोनि, एन.डी.पी.एस पथक नागपूर शहर, सिमा सुरवे मपोनि, भरोसा सेल नागपूर शहर व मोठया प्रमाणात विद्यार्थी आणि जनसमुदाय उपस्थित होते.