सोख्ता भवनच्या जागेवर वाणिज्यिक संकुल प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात

– ६३५३ चौरस मीटर जागेत प्रकल्प, पार्कींगसाठी तीन तळघर, सामाजिक सभागृह

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या मालकीच्या गांधीबाग येथील जागेवर जीर्णावस्थेत असलेल्या सोख्ता भवन इमारतीच्या जागेवर डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट ॲण्ड सेल (डीबीएफएसएम) तत्वावर वाणिज्यिक संकुल बांधकाम प्रकल्पास नागपूर महानगरपालिकेद्वारे मंजुरी प्रदान करण्यात आलेली असुन या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे.

महाराष्ट्र शासन प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम अन्वये सोख्ता भवन इमारत पाडून येथील ६३५३ चौरस मीटर जागा नागरी सुविधा केंद्र व व्यापारी संकुल या वापराकरीता महाराष्ट्र शासनाच्या नगर वकास विभागाद्वारे मान्यता प्रदान करण्यात आली होती. त्यानुसार या प्रकल्पाचे सल्लागार व वास्तुशिल्पकार मे. डिझाईन सेल यांनी या प्रकल्पाचे आराखडे तयार करुन नगर रचना विभागाची मान्यता घेतलेली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षते खालील पीपीपी/डीबीएफओएस प्रकल्पाच्या छाननी समितीने या प्रकल्पाच्या अहवालास मान्यता दिलेली आहे.

एकुण २८९२२.२० चौरस मीटर क्षेत्रफळात प्रकल्पाचे बांधकाम होणार आहे. प्रकल्पामध्ये तीन तळघर पार्किंगचे नियोजन केलेले असून यामध्ये २८३ कार, ५६६ स्कूटर आणि ५६६ सायकल पार्कींगची क्षमता असेल. या प्रकल्पामध्ये सातव्या माळयावर ६०० व्यक्ती क्षमतचे सामाजिक सभागृहाचे बांधकाम नियोजित आहे. या प्रकल्पाची बांधकाम किंमत २०७.९८ कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. प्रकल्प बांधकामाचा कालावधी ३ वर्षे निश्चित करण्यात आला आहे. या प्रकल्पामधून मनपास देय होणारी रक्कम कमीत कमी २२४ कोटी ही ४ वर्षात पूर्वनियोजित वार्षिक टक्केवारीनुसार विकासकाने मनपास जमा करावयाची आहे. त्यानुसार पहिल्या वर्षी १५ टक्के, दुस-या वर्षी ३० टक्के, तिस-या वर्षी २० टक्के आणि चवथ्या वर्षी २५ टक्के अशा टक्केवारीनुसार मनपास रक्कम दिली जाणार आहे. विकासकाला प्रकल्पातील विक्री घटक विकण्याकरीता ५ वर्षाचा कालावधी देण्यात आलेला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण सुरु

Wed Jan 24 , 2024
– ३१ जानेवारी पर्यंत सर्वेक्षण पूर्ण करणे बंधनकारक – नागरिकांनी सहकार्य करण्याचे मनपाचे आवाहन चंद्रपूर :- महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार चंद्रपूर शहरात मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्याचे कार्य सुरु झाले असुन सर्वेक्षण युद्धपातळीवर करण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ८२५ प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे.सर्वेक्षण ३१ जानेवारी पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक असल्याने वेळेचा अभाव लक्षात घेता सर्वे करणाऱ्या प्रगणकांनी विचारलेल्या प्रश्नांची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com