नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या वतीने सुदर्शन स्पोर्टिंग क्लब नागपूर द्वारा आयोजित उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिराला शनिवारी (ता. 6) रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात सुरुवात झाली.
शिबिराचे उद्घाटन नागपूर नगर आखाडा संघटन सचिव ईश्वर झाळे व नागपूर कुस्ती अस्थायी समीती सचिव हरिहर भावडकर यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी मनपा क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर, सुदर्शन स्पोर्टिंग क्लब नागपूरचे अध्यक्ष कृष्णा नीसार, विवेक अवसरे, दयाराम भोतमांगे, सतीश वाघमारे, पांडुरंग कडे, सुनील गाडगीरवार, रेड्डी, कुणाल गुजर, कोच शुभम समुन्द्रे , कोच पवन समुंद्रे उपस्थित होते.
लहान मुला मुलींना व्यायामाची आवड निर्माण व्हावी व त्याद्वारे सुदृढ समाजाची निर्मिती व्हावी तसेच सुदृढ आरोग्यासाठी भारताच्या पारंपरिक खेळ कुस्ती या खेळाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. अलीकडच्या काळात भारतास ऑलिम्पिक मध्ये वैयक्तिक खेळ प्रकारात सर्वात जास्त मेडल मिळवून देणारा खेळ कुस्ती आहे. कुस्ती या खेळाला नव संजिवणी मिळावी, कुस्ती नागपूर/विदर्भात वाढावी या उद्देशाने उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे संचालन सुदर्शन स्पोर्टिंग क्लब नागपूरचे सचिव संदिप दिलीप खरे यांनी तर प्रास्ताविक सिद्धार्थ खरे यांनी केले. आभार शुभम समुन्द्रे यांनी मानले.
हे शिबिर 1 महिने चालणार असून ज्या खेळाडूंना प्रशिक्षण घ्यायचे असेल त्यांनी कविवर्य सुरेश भट सभागृहात संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.