कामठीत अतिक्रमन कारवाहीचा शुभारंभ

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या परिसरात अतिक्रमणाचा वेढा वाढत असल्याची बाब नगर परिषद प्रशासनाच्या निदर्शनास येताच मुख्याधिकारी संदीप बोरकर यांच्या मार्गदर्शनार्थ आज सकाळी 10 वाजेपासून कामठी शहरात अतिक्रमण कारवाही चा शुभारंभ करण्यात आला.

या अतिक्रमन कारवाही अंतर्गत कामठी मोटर स्टँड चौक ते भाजी मंडी ,शितला माता मंदिर पर्यंत असलेले अतिक्रमण काढण्यात आले ज्यामध्ये रस्त्यावर केलेले अतिक्रमन,अवैध होर्डिंग आदीचे अतिक्रमण बाहेर काढण्यात आले .

शहरातील अनेक भागात नागरिकांनी बिनधास्त अतिक्रमण केल्याने शहराचा स्मार्ट सिटी चा प्रश्न हा अंधातरी असल्याने शहरातील अतिक्रमण काढणे गरजेचे झाल्याने मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी तटस्थ भूमिका घेऊन आजपासून शहरात अतिक्रमण कारवाहिला सुरुवात केली आहे.ही अतिक्रमण कारवाही निरंतर सुरू राहणार असून शहराच्या विकासात्मक दृष्टिकोणातून नागरिकांनी या अतिक्रमण कारवाही ला सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी केले आहे.

आज मोटर स्टँड चौक ते भाजी मंडी चौक पर्यंत अतिक्रमण कारवाही करण्यात आली असून या कारवाहीत नगर परिषद अधिकारी विक्रम चव्हाण, प्रदीप भोकरे, गफ्फु मेथीयां, घोडेस्वार,रंजित माटे,पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे आदींनी मोलाची भूमिका साकारली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

देशातील 146 धरणांमध्ये सद्यस्थितीत 59.503 अब्ज घनमीटर पाणीसाठा

Fri Jul 14 , 2023
नवी दिल्ली :- केंद्रीय जल आयोग साप्ताहिक आधारावर देशातील 146 धरणांच्या जिवंत पाणी साठवण स्थितीचे निरीक्षण करते.यापैकी 18 धरणे जलविद्युत प्रकल्पातील आहेत या धरणांची एकूण प्रत्यक्ष साठवण क्षमता 34.960 अब्ज घनमीटर आहे.146 धरणांची एकूण जिवंत साठवण क्षमता 178.185 अब्ज घनमीटर आहे. दिनांक 13.07.2023 रोजी जारी केलेल्या धरण जलसाठवण संदर्भातील विवरणानुसार ,या धरणांमध्ये उपलब्ध असलेला जिवंत पाणीसाठा 59.503 अब्ज घनमीटर असून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com