नागपूर :- दिनांक १२.०२.२०२४ चे २२.०० वा. ते दि. १३.०२.२०२४ चे ०१.०० वा. चे दरम्यान, पोलीस ठाणे कळमणा व यशोधरानगर अंतर्गत कोंबींग ऑपरेशन रावविण्यात आले, कोंबींग ऑपरेशन करीता मा. पोलीस आयुक्त हे स्वतः हजर आले होते. नमुद कोंबोंग ऑपरेशन पोलीस ठाणे कळमणा, यशोवरानगर तसेच गुन्हेशाखा येथील अधिकारी व अंमलदार यांनी राबविले, पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार, अवैध धंदे करणारे तसेच बोरी, घरफोडी करणारे, हद्दपार, ईत्यादी आरोपींची तपासणी करण्यात आली. पोलीस ठाणे कळमणा अंतर्गत दोन महाराष्ट्र दारूबंदी कायदान्वये कारवाई करण्यात आल्या तसेच आरोपी स्वप्नील उर्फ कालू महादेव बरबट वय २८ वर्ष रा. गुलशन नगर, वांजरा ले-आउट, कळमणा यांचे ताब्यातुन एक लोखंडी तलवार किमती अंदाजे ५००/- रू ची मिळून आलयाने जप्त करण्यात आली आरोपीविरुद कलम ४/२५ भा.ह.का सहकलम १३५ म.पो.का अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला, राबविण्यात आलेल्या नाकाबंदी मध्ये एकुण ३८ वाहने चेक करण्यात आली एका संशयीत वाहनावर डिटेन कारवाई करण्यात आली, पोलीस ठाणे यशोधरानगर अंतर्गत आरोपी लक्की लक्ष्मण मलिक वय २५ वर्ष रा. ठक्करग्राम याचे ताब्यातुन एक लोखंडी धारदार शस्त्र मिळून आल्याने जप्त करण्यात आले, आरोपीविरूध्द कलम ४/२५ भा.ह.का सहकलम १३५ म.पो.का अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. राबविण्यात आलेल्या नाकाबंदी मध्ये एकुण ६ वाहनांवर चालान कारवाई करण्यात आली. एका संशयीत वाहनावर डिटेन कारवाई करण्यात आली.
कोंबींग ऑपरेशन कारवाई पोलीस आयुक्त नागपूर शहर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन),पोलीस उप आयुक्त परि क. ५, सहा. पोलीस आयुक्त जरीपटका विभाग, पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार तसेच गुन्हेशाखा येथील अधिकारी व अंमलदार यांनी राबविली.