पोलिओ लसीकरणाचा घेतला आढावा …
१६७६ लाभार्थ्यांचे झाले लसिकरण…वैदिकिय अधीक्षक डॉ हेमंतकुमार वरके
रामटेक :- पल्स पोलिओ लसीकरण दिवसाच्या निमित्ताने राज्यातील पाच वर्षाच्या आतील कोणतेही बालक या लसीकरणाच्या अभियानापासून वंचित राहू नये यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे.
देशात आणि राज्यात पल्स पोलिओ लसीकरण दिवस साजरा करण्यात येतोय. रामटेक उपजिल्हा रुग्णालयात जिल्हाधिकारी आर विमला ,
सिव्हिल सर्जन डॉ थोरात, आर.एम. ओ डॉ दिलीप मडावी, यांनी भेट दिली. व लसीकरणाची पाहणी केली.
रामटेक शहरात १८४८ लाभार्थ्यांपैकी १६७६ लसीकरण पूर्ण झाले. अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैदकिय अधीक्षक हेमंतकुमार वारके यांनी दिली.यावेळी आरोग्य अधिकारी डॉ सारिका जाजुलवार, डॉ अली , डॉ साभत खान , डॉ कुंदनवार , उषा कुमार , अर्चना मडावी , तसेच कर्मचारी उपस्थित होते.