संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भारताच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने बौद्ध बांधव हे नागपूर येथील दीक्षाभूमी तसेच कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पलला भेट देत असतात त्या निमित्ताने नागपूर चे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी आज बुधवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी ड्रॅगन पॅलेस येथे संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली.या बैठकीला ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या प्रमुख व माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी नगर परिषद चे मुख्याधिकारी यांना ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला भेट देणाऱ्या लोकांकरिता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वछतागृहे,तसेच परिसरात नागरी सुविधा उपलब्ध करण्याच्या संदर्भात निर्देश दिले.लोककर्म विभागाच्या अधिकाऱ्याकडून बसेस,चार चाकी वाहन तसेच दोन चाकी वाहनांसाठी उपलब्ध असलेल्या रस्त्याची महितो घेतली व रमानगर उडानपुलाचे काम पूर्ण न झाल्यामुळे नागपूर वरून येणाऱ्या बसेस करिता मार्ग उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.
राज्य परिवहन मंडळाचे अधिकारी यांनी रमानगर पुलाकडून येणाऱ्या मार्गानी बसेस परत जाण्याकरिता आजनी मार्गानी नवीन अंडरपास येथून नॅशनल हायवे वर काढता येतील अशी माहिती दिली.परंतु या प्रवासामुळे लोकांना गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले. आरोग्य विभागाने अधिकाऱ्यना 24*7आरोग्य केंद्राकरिता डॉक्टर्स व नर्सेस उपलब्ध करण्याचे निर्देश दिले.
या बैठकीत ऍड सुलेखा कुंभारे यांनी बसेसनी येणाऱ्या लोकांकरिता रमानगर उडान पुला मार्गाने अनेक अडचणी असल्याची माहिती दिली व जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी अशी विनंती केली त्याप्रमाणे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी रमानगर उडानपुलाची पाहणी केली व येणाऱ्या बौद्ध बांधवा करिता बसेसचा मार्ग उपलब्ध करून देण्याचा संदर्भात लोककर्म विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
वरील आढावा बैठकीला उपविभागोय दंडाधीकारी महाजन, तहसिलदार गणेश जगदाळे, नायब तहसीलदार उपेश अंबादे, मुख्याधिकारी संदीप बोरकर, नगर रचना विभागाचे विक्रम चव्हाण,प्रदीप भोकरे,आरोग्य विभागाच्या डॉ नैना धुपारे, लोककर्म विभागाचे अभियंता जनबंधु, व इतर विभागाचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.