वेकोलि सुरक्षा रक्षकांची कारवाई तीन आरोपीवर गुन्हा दाखल.
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पश्चिमेस १७ कि मी अंतरावरील वेकोलि खुली कोळसा खदान इंदर कोळ सा यार्ड चिरादेव शिवार येथुन तीन आरोपींतानी कोळ सा चोरून नेल्याने वेकोलि खुली खदान सुरक्षा रक्षकां नी चोरीचा कोळसा २२७९० टन किमत १,१३,९५० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून कन्हान पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल केल्याने तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस पुढील तपास करित आहे.
प्राप्त माहिती नुसार मंगळवार (दि.१५) मार्च २०२२ ला रात्री १२ वाजता ते सकाळी ८ वाजता पर्यंत इसांत बंडुजी शेंडे वय ३२ वर्ष राह. गोंडेगाव काॅलोनी व त्याचे सोबत गार्ड कुणाल खंगारे, ड्राइवर आकाश रंगारी असे मिळुन वेकोलि गोंडेगाव उपक्षेत्र खुली खदान परिसरात पेट्रोलिंग करीत असता इसांत शेंडे हयाना गोंडेगाव खुली खदान च्या इंदर कोळसा यार्ड चिरादेव परिसरात काही इसम कोळसाचा ढिगारा जवळ उभे दिसले आणि सुरक्षा गार्ड ला पाहुण तीन आरोपी पळुन गेले. इसांत शेंडे त्यांना ओळखत असुन आरोपी १) संजु कश्यप २) फारूख अब्दुल्ला शेख ३) चिंटु सिंग तिघे ही राह. कन्हान असे असुन जमीनी वर पडलेला कोळसा पे लोडर च्या साहयाने ट्रक मध्ये भरून कोळसा खुली खदान गोंडेगाव च्या वजन काट यावर ट्रक मधील कोळस्याचे वजन हे एकुण २२७९० किलो असुन किंमत अंदाजे ५००० रूपये प्रति टन एकुण १,१३,९५० रूपयाचा मुद्देमाल घटनास्थळा वरून जप्त केला व कोल डिपो मध्ये जमा करण्यात आला. सदर प्रकरणा बाबत कन्हान पोलीस स्टेशनला फिर्यादी इसांत बंडुजी शेंडे यांच्या तोंडी तक्रारी वरून १) संजु कश्यप २) फारुख अब्दुल्ला शेख ३) चिंटु सिंग अश्या तीन आरोपी विरुद्ध अप क्र १३७/२०२२ कलम ३७९ , ३४ भांदवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.