भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय व प्रा.आ.केंद्र मोहदुरा येथे डॉ. आर.बी.पवार सहसंचालक (हि. ह व जलजन्य आजार) पुणे, डॉ.महेंद्र जगताप (राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम) पुणे, डॉ श्याम निमगडे (सहाय्यक संचालक आ.सेवा हि.ह व जलजन्य आजार) नागपूर यांनी भेट देऊन आरोग्य विषयक कामकाजासह विविध अभियानाच्या अंलबजावणीचा आढावा घेतला.
यावेळी आयोजित बैठकीत त्यांनी उन्हाळ्यामध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने उष्माघात बाबत दक्ष राहण्याच्या सूचना केल्या, एस पी एल फॉर्म बाबत आढावा घेऊन जिल्ह्याचे काम चांगले असल्यामुळे समाधान व्यक्त केले व त्यामध्ये सातत्य ठेवण्या बाबत सूचना केल्या. जलजन्य व कीटकजन्य आजाराबाबत आढावा घेऊन दैनंदिन रक्त नमुने संकलन वाढवण्याबाबत सूचना केल्या.
जिल्हा सामान्य रुग्णालय येथे भेट देऊन तेथील उष्माघात कक्ष,डायलेसिस कक्ष,जनरल वॉर्ड यांची पाहणी करून रुग्णांना वेळेत उपचार मिळत असल्यामुळे समाधान व्यक्त केले.
तसेच प्रा.आ.केंद्र मोहदूर येथे भेट देऊन शीतसाखळी कक्ष,उष्माघात कक्ष वॉर्ड,लसीकरण कक्ष यांची पाहणी करून राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम बाबत आढावा आढावा घेण्यात आला. माता बाल संगोपन कार्यक्रम, क्षयरोग, कृष्ठरोग, साथरोग या सर्व राष्ट्रीय कार्यक्रमाबाबत आढावा घेऊन मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ. मिलिंद सोमकुंवर जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. डी के सोयाम जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. सचिन चव्हाण अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. महेंद्र धनविजय सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. कविता कवीश्वर जिल्हा हिवताप अधिकारी, डॉ. श्रीकांत अंबेकर जिल्हा साथरोग अधिकारी यांच्यासह अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होते.