यवतमाळ :- मेरा युवा भारत वर्धापण दिवस तथा दिपावली निमित्य युवा कार्यक्रम व क्रिडा मंत्रालयाच्या नेहरु युवा केन्द्राच्या माध्यमाने मार्केट स्वच्छता अभियान, वाहतुक स्वयंसेवा, हॉस्पीटल स्वयंसेवा अशा कार्यक्रमांतर्गत स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे. यवतमाळ शहरात ठिकठिकाणी राबविलेल्या या स्वच्छता मोहिमेत स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शहरातील मेन मार्केट, आझाद मैदान, फटाका मार्केट, स्वेटर मार्केट, मेन लाईन त्याचप्रमाणे नेताजी चौक, पाच कंदील चौक, नगर भवन, दत्त चौक, भाजी मंडी या भागात नगर परिषद व नेहरु युवा केन्द्राच्या माध्यमाने रस्ते स्वच्छ करुन परिसरात असलेला कचरा, प्लास्टीक तसेच इतर टाकावू वस्तू, डस्टबिनमध्ये गोळा करुन घंटागाडीच्या सहाय्याने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली.
व्यापारी तसेच किरकोळ दुकानदार यांना आपल्या दुकानातील कचरा योग्य त्या ठिकाणी टाकण्याकरीता सूचना देण्यात आल्या. दुकानाच्या आजुबाजुला असलेला केरकचरा गोळा करण्यात आला. बाजारात होणारी खरेदी करण्याकरीता ग्राहकांची गर्दी बघता सुरक्षेच्यादृष्टीने ग्राहकांना तसेच व्यापारी यांना आपली वाहने योग्य ठिकाणी लावण्याकरीता सूचना देण्यात आल्या. कुणीही रस्त्यावर व इतरत्र कचरा टाकू नये या करीता जनजागृती करण्यात आली.
परिसरातील प्लास्टीक व कचरा गोळा करुन परिसर सणासुदीच्या वेळेला स्वच्छ करण्यात आला. यामुळे परिसरातील लोक तसेच व्यापारी यांनी स्वच्छता करणाऱ्या स्वयंसेवाकांना शाब्बासकी दिली व अशा प्रकारे जर स्वच्छता केली गेली आणि जनजागृती केली तर निश्चितच परिसर हा स्वच्छ राहील याची खात्री बाळगली.
याकरीता नगर परिषदेचे कर्मचारी सागेर बुटे यांनी सहकार्य केले आणि नेहमी परिसर स्वच्छ ठेवण्या करीता आपली जबाबदारी आहे. नरेद्र चंडाले यांनी स्वयंसेवकांना सूचना देवून परिसर स्वच्छ करण्याकरीता मदत केली. नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम व अनिल ढेंगे यांनी उपस्थित स्वयंसेवकांद्वारा संपूर्ण परिसर स्वच्छ करुन लोकांमध्ये जनजागृती व्हावी याकरीता व्यापारी तसेच परिसरातील जनतेस स्वच्छतेबाबत मार्गदर्शन व जनजागृती केली, असे जिल्हा युवा अधिकारी यांनी कळविले आहे.