संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी: ता प्र 10 :- येथील समाजकार्य महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा सप्ताह विविध कार्यक्रम उपक्रमांद्वारे साजरा करण्यात येत आहे. याअंतर्गत आज श्रमदान व स्वच्छता अभियान कार्यक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयातील स्वच्छता कर्मचारी वसंता तांबडे यांच्या हस्ते स्वच्छतेचे पुरस्कर्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून स्वच्छता अभियानास प्रारंभ झाला. महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हाती झाडू, खराटे घेऊन महाविद्यालयाचा परिसर व दादासाहेब कुंभारे शैक्षणिक प्रशिक्षण संस्थेचा परिसर स्वच्छ केला. प्लास्टिक, झाडांची कुजलेली पाने, दगड धोंडे एकत्र करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली व संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. या स्वच्छता अभियानात डॉ. प्रणाली पाटील, प्रा.उज्वला सुखदेवे, डॉ.राष्ट्रपाल मेश्राम,डॉ.सविता चिवंडे,डॉ.ओमप्रकाश कश्यप, डॉ. निशांत माटे,प्रा.शशिकांत डांगे,डॉ. मनीष मुडे,प्रा. हर्षल गजभिये, प्रा.राहुल जुनगरी,प्रा.राम बुटके,प्रा.गिरीश आत्राम, प्रा.आवेशखरणी शेख , शिक्षकेतर कर्मचारी उज्ज्वला मेश्राम, गजानन कारमोरे, प्रतीक कोकोडे, किरण गजभिये, वसंता तांबडे, शाशील बोरकर, राहुल पाटील उपस्थित होते. संचालन व प्रास्ताविक डॉ. राष्ट्रपाल मेश्राम यांनी केले.