नागपूर :- नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी आपल्या स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा करण्याच्या वचनबद्धतेला अनुसरत दरवर्षीप्रमाणे राबलेली आपली विशेष वार्षिक जलकुंभ स्वच्छता मोहीम-२०२२-२३ आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. या अंतर्गत लक्ष्मी नगर झोन अंतर्गत लक्ष्मी नगर (जुने) जलकुंभ एप्रिल ११ (मंगळवार) रोजी स्वच्छ करण्यात येणार आहेत.
नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर दरवर्षीच नागपुरातील सर्व जलकुंभ वर्षातून एकदा स्वच्छता करीत असते. हि परंपरा नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर ने गेल्या २०१२ पासून दरवर्षी नित्यनियमाने सुरु केलेली आहे. सर्व जलकुंभ सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान, फक्त ८ तासात नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर च्या अत्याधुनिक प्रणाली द्वारे स्वच्छ करण्यात येतात.
या जलकुंभ स्वच्छतेमुळे तेथील भागात दिलेल्या तारखेनुसार पाणीपुरवठा बाधित राहील., टँकर द्वारे देखील पाणीपुरवठा ह्या दरम्यान शक्य होणार नाही .तरीही नागरिकांनी आपल्या परिवाराच्या वापराकरिता पुरेसा पाणी साठा करून ठेवावा हि विनंती.
लक्ष्मी नगर (जुने) जलकुंभ एप्रिल ११ (मंगळवार) पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग : अभ्यंकर नगर बजाज नगर, माधव नगर, लक्ष्मी नगर, बुटी ले आउट, आठ रास्ता चौक , निरी परिसर , माटे चौक, फ्रेंड्स ले आउट , विएनआयटी परिसर ,, गिट्टीखदान ले आउट , पी अँड टी कॉलोनी, राहते ले आउट, इनकम टॅक्स कॉलोनी, एस इ रेल्वे कॉलोनी, सेंट्रल एक्सिस कॉलोनी, धनगरपूरा, तात्या टोपे नगर, आरपीटीएस रोड, अत्रे ले आउट, सुरेंद्र नगर, जेरील लावुन चौक, राहटे कॉलोनी आणि दीक्षाभूमी रोड आणि इतर परिसर.
ह्या जलकुंभ स्वच्छता शटडाऊन दरम्यान टँकर्सद्वारेही पाणीपुरवठा होणार नसल्याने, मनपा-OCWने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
कुठंल्याही प्रकारच्या अधिक माहितीकरिता नागरिक नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर च्या नि:शुल्क मदत क्रमांक १८००- २६६-९८९९ वर संपर्क करू शकतात.