– काँग्रेसला जे जमले नाही ते आज महायुती सरकारने करून दाखविले
मुंबई :- जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील कलम 370 रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णयावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्या. संजय किशन कौल, न्या. संजीव खन्ना, न्या. भूषण आर. गवई आणि न्या. सूर्यकांत यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. केंद्र सरकारचा कलम ३७० रद्द करने हे ऐतिहासिक निर्णय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जम्मु-काश्मीरच्या नागरिकांना दिलेला खऱ्या अर्थाने मिळालेला न्याय आहे, अशी प्रतिक्रीया पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप भाई कवाडे यांनी केले.
प्रसिद्धी पत्रकाद्वारे बोलताना जयदीप कवाडे यांनी सांगितले की, देशाच्या इतिहासात आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत सरकारने घेतलेल्या काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने मोहोर उमटवली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे भारताबरोबरच जम्मु-काश्मीरच्या लोकांना स्वातंत्र्यच मिळाले आहे, असेही जयदीप कवाडे म्हणाले. दहशतवाद्यांचा बंदीस्त असलेल्या जम्मु-काश्मीर नागरिकांचा आता विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. तेथील नागरिक आता स्वतंत्ररित्या एकसंघ भारतातील रहिवासी होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्वोच्च न्यायालयामुळे आज नवा इतिहासच घडविल्याचे जयदीप कवाडे म्हणाले.