संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- विविध जाती धर्माच्या नागरिकांनी आपसी मतभेद विसरून आगामी होलि, धुलिवंदन, सबेबारात सण मोठ्या उत्साहात साजरे करून शहरात कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आव्हान पोलीस उपायुक्त श्रवण दत्त यांनी नवीन कामठी व जुनी कामठी पोलीस स्टेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शांतता समितीच्या सभेत मार्गदर्शन करताना व्यक्त केले पोलीस प्रशासनाचे वतीने आगामी होली धुलीवंदन व सबेबारात सणाच्या पर्वावर गंज बालाजी मंदिर सभागृहात शांतता समितीचे आयोजन करण्यात आले होते सभेची सुरुवात पोलीस उपायुक्त श्रवण दत्त यांचे हस्ते दीप प्रज्वलन व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आले यावेळी सहाय्यक पोलीस उपायुक्त पी एन नलवाडे, नवीन कामठीचे ठाणेदार भरत क्षीरसागर ,जुनी कामठीचे ठाणेदार दीपक भिताडे वाहतूक पोलीस निरीक्षक दीपक गोसावी ,हेड कॉन्स्टेबल अखिलेश ठाकूर ,अंकित ठाकूर ,सुचित गजभिये, शैलेश पांडे उपस्थित होतेे.
सभेत एडवोकेट विद्या भिमटे,नगरसेविका सुषमा शिलाम, आरिफ कुरेशी ,लालसिंग यादव ,एडवोकेट नीतू शर्मा, मोहम्मद आर्षद ,अतिकुर रहमान यांनी होळी ,धुळीवंदन व सबेबारात सणानिमित्त शहरातील बंद पथदिवे ,विविध ठिकाणी लावण्यात येणारे डीजे आवाज कमी ,धुलीवंदनाचे दिवशी काही तरुण नशेत उल्लटबाजी करून कायदा सुव्यवस्था हातात घेतात अशावर कठोक कारवाई करण्याची मागणी सभेत नागरिकांनी करून पोलीस प्रशासनाचे वतीने चौका चौकात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी केली व कोणत्याही जाती धर्माचा तरुण सणा दरम्यान कायदा सुव्यवस्था हातात घेत असल त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली सभेत मार्गदर्शन करताना पोलीस उप आयुक्त श्रवण दत्त यांनी म्हणाले होली, धुलीवंदन व सबे बारात सणानिमित्त पोलीस प्रशासनाचे वतीने मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावून जो कोणी कायदा हातात घेऊन नियमाचे उल्लंघन करेल त्याची गाय केली जाणार नाही सोबतच शहरात परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडत असल्यास त्याची माहिती आपण पोलीस प्रशासनाला देऊन आगामी धुलीवंदन होली व सभेबरात विविध सण जाती-धर्माच्या नागरिकांनी आपसी मतभेद विसरून सण मोठ्या उत्साहात साजरा करून राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याचे आव्हान केले. सभेचे प्रास्ताविक नवीन कामठीचे ठाणेदार भरत शिरसागर यांनी केले संचालन जुनी कामठीचे ठाणेदार दीपक भिताडे यांनी केले व आभार प्रदर्शन अखिलेश ठाकूर यांनी मांनले सभेला उमेश मस्के, रिजवान कुरेशी, लाला खंडेलवाल ,शिल्पा मेश्राम सह मोठ्या संख्येने गणमान्य नागरिक उपस्थित होते.