मतदार याद्या अद्ययावत करण्यास नागरीकांचे सहकार्य आवश्यक – आयुक्त विपीन पालीवाल

३ व ४ डिसेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन

चंद्रपूर  :- भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमां तर्गत नवमतदारांची नोंदणी, मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी, सूचना व प्रतिक्रियांसाठी चंद्रपूर शहरातील नागरीकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे आयुक्त विपीन पालीवाल यांनी बैठकीत संगितले. राजकीय पक्षांचे पदाधिकारी / माजी मनपा सदस्य यांच्यासाठी २८ नोव्हेंबर रोजी मनपा राणी हिराई सभागृहात आयोजीत विशेष बैठकीत ते बोलत होते.

निवडणुक आयोगाद्वारे मतदार यादी अद्ययावत करण्यास विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर दरम्यान राबविला जात आहे. यात शहरातील नवीन मतदारांची नोंदणी करणे,दुबार, स्थलांतरित, मयत मतदारांची नावे वगळणे, नवीन मतदारांची नोंदणी करणे, मतदार ओळखपत्र आधारकार्डशी जोडणे इत्यादी कामे केली जाणार आहे. मतदार यादीत आपले नाव अद्ययावत करण्याची ही एक मोठी संधी असुन याचा नागरीकांनी लाभ घेणे आवश्यक आहे. राजकीय पक्षांचा जनसंपर्क चांगला असतो या संपर्काच्या माध्यमातुन राजकीय पक्षांनीही मतदारांना प्रेरित करावे.

९ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीचे तपासणी करून मतदार यादीच्या तपशिलात काही आक्षेप असल्यास दावे व हरकती स्वीकारणे बाबत वेळापत्रक घोषित करण्यात आले असुन ३ व ४ नोव्हेंबर रोजी प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीत राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींद्वारे मांडण्यात आलेल्या तक्रारी तसेच सूचनाच्या नोंदी घेण्यात आल्या. याप्रसंगी उपायुक्त अशोक गराटे,मनपा निवडणुक विभागाचे कर्मचारी तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी / माजी मनपा सदस्यांची उपस्थिती होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Prime Minister Narendra Modi, in the latest edition of Mann Ki Baat, highlights the importance of Indian Music in uniting people

Wed Nov 30 , 2022
It is our responsibility to preserve our traditions and traditional knowledge, to promote it and to take it forward as much as possible – Narendra Modi New Delhi :- Prime Minister Narendra Modi, during the 95th Edition of ‘Mann Ki Baat’ on 27th November, 2022 said that our country is home to the oldest traditions in the world. Therefore, it […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!