कोळसा खदान च्या दुषित पाणी, उंच मातीच्या डोंगरामुळे पाणी, वायु प्रदुर्षनाने नागरिक त्रस्त

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– वेकोलि च्या नियम बाहय कार्या विरूध्द नागरिक जन आंदोलनाच्या तयारीत. 

कन्हान :- वेकोलि कामठी उपक्षेत्रांतर्गत कामठी व इंदर खुली कोळसा खदान अधिका-या व्दारे कोळसा उत्खननाकरिता अतिदाब व जास्त क्षमतेच्या दगानीने आजुबाजुच्या घराना हादरे बसुन घराच्या भिंतीला भेंगा पडुन घरे जिर्ण होऊन कधिही पडुन जिवहानी होण्याची शक्यता नाकरता येत नाही. जमिनीतील कोळसा व बारूद मिश्रीत दुषित पाणी मोठ मोठया पंप, पाईप व्दारे कुठलिही प्रक्रिया न करता नाल्याने कन्हान नदी त सोडण्याचे पाप करित आहे. पिपरी, कन्हान, कांद्री च्या लोकवस्ती लगत माती डम्पींग करू न उंचच उंच मोठ कृत्रिम डोंगर उभे केल्याने खदानच्या जवळ पास ३ ते ५ किमी पर्यंत मोठया प्रमाणात वायु त कोळसा मिश्रित धुळी प्रदुर्षनाने परिसरातील नागरि कांच्या आरोग्यावर दुष परिणाम होऊन आरोग्याच्या विविध समस्येचे माहेर घर होऊन येथील नागरिक भयं कर त्रस्त होत असल्याने परिसरातील नागरिक वेको लि खुली कोळसा खदानच्या नियम बाहय मनमानी, हेकेखोर पणा विरूध्द नागरिक बैठकीने संवाद साधत जन आंदोलनाकरिता सामोर येत आहे.

भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत वेकोलि कामठी उपक्षेत्र अंतर्गत कामठी व इंदर खुली कोळसा खदान या दोन खदान व्दारे जुनिकामठी, गाडेघाट, पिपरी, कन्हान, कांद्री, टेकाडी, गोंडेगाव व वराडा परिसरातील शेतक-यांच्या शेत जमिनी अधिग्रहित करून मोठया प्रमाणात कोळसा उत्खनन करून भरपुर लाभ कमवित आहे. परंतु कित्येक शेतक-यांच्या शेतीचा योग्य मोबदला, नौकरी न देता वेगवेगळ्या समस्या, अडचणी सामोर करून शेतक-याना त्रास देत आहे. भुमिगत कोळसा खाणी सुरू असताना अपघात व जिवित हानीचे प्रमाण कमी करण्याकरिता वेकोलि प्रशासना ने खुल्या कोळसा खदान सुरू केल्याने या खुली कोळसा खदानच्या कोळसा, माती, दुषित पाण्यामुळे खदान लगतच्या ३ ते ५ किमी पर्यंत लोकवस्तीच्या नागरिकां चे व शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान वेकोलि प्रशास नाच्या अलगर्जीपणा व “हम करे सो कायदा ” या कार्यप्रणाली मुळे होत असल्याने नेहमी येथील नागरिक न्याय मागणी करित असताना वेकोलि अधिकारी त्यांचा आवाज प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या मदतीने दाबत असल्याने परिसरातील नागरिकामध्ये वेकोलि अधिका-या विरूध्द भयंकर संताप उफाळत आहे.

वेकोलि कामठी उपक्षेत्र अंतर्गत कामठी व इंदर या दोन खुली कोळसा खदान व्दारे कोळसा उत्खनन करिता माती उत्खनन करून माती डम्पिंग लोकवस्ती लगत करून नियम बाहय मोठमोठे कृत्रिम डोंगर निर्मा ण करित आहे. ही माती डम्पिंग करताना परिसरातील वातावरणात मोठया प्रमाणात कोळसा मिश्रित माती धुळ प्रदुर्षनाने स्वासोश्वासा व्दारे नागरिकांच्या शरिरात धुळीमुळे आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. कोळसा उत्खननाकरिता कोळस्याच्या मोठया दगडात शंभर च्या जवळपास छिद्र करून त्यात बारूद भरून एकाच वेळी अतिउच दाबाची दगान करित असल्याने परिसरातील जमिनीमध्ये कंपनाने हाद-याने घराच्या भिंतीला भेगा पडत आहे. घरातील सामान पडु लागले, या दगानीमुळे घरे कमजोर होऊन काही घर पडुन जिवहानी सुध्दा होत आहे. दगानी नंतर मोठया प्रमा णात जमा होणारे बारूद व कोळसा मिश्रित दुषित पाणी मोठमोठया पंपाने ओढुन कुठलिही पाण्यावर प्रक्रिया न करता गाडेघाट व पिपरी च्या नाल्या व्दारे कन्हान नदीत सोडुन वेकोलि कन्हान नदीच्या पिण्याच्या पाण्यात विष कालवण्याचे पाप बिनधास्त पणे करित आहे. कन्हान व परिसरातील नगरपरिषद, ग्राम पंचायत व्दारे फक्त बिचिंग पावडर महिन्यात एक , दोनदा टाकुन पाणी नियमित नागरिकांना पिण्यास पुरवठा करित असल्याने या दुषित पाण्याने नागरिकां च्या आरोग्यावर दुषपरिणाम होऊन रूग्णाची दिवसे दिवस वाढ होत असल्याने कन्हान ला खाजगी दवाखाने वाढत आहे.

कोळसा उत्खननाकरिता जुण्या मोठ मोठया वृक्षाची खुलेआम कतल करण्यात आली असुन वेकोलि व्दारे कागदोपत्री वृक्षरोपन करित असल्याने वेकोलि परिसरात फक्त बांबु व सुबाभुळची झाडे लावलेली दिसतात. माती कोळस्याची वाहतुक ट्रकनी होत असल्याने सुध्दा परिसरात मोठया प्रमाणे कोळ सा मिश्रित धुळीच्या प्रदुर्षनाने सर्व सिमा ओलांडुन सुध्दा महाराष्ट्र प्रदुर्षन नियंत्रक मंडळाचे अधिकारी मुंग गिळुन गप्प बसलेले आहे. शासन, प्रशासनाचे अधिका -याच्या सहकार्याने वेकोलि प्रशासनाचे अधिकारी हेकेखौरपणे परिसारातील नागरिकांशी हुकुमशाही पध्दतीने वागणुक करित असल्याने जुनिकामठी, गाडे घाट, पिपरी, कन्हान, कांद्री, टेकाडी, गोंडेगाव व वराडा परिसरातील शेतकरी, नागरिकां मध्ये वेकोलि प्रशासन अधिका-या विरूध्द असंतोष उफाळुन येऊन नागरिकां नी माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या नेतुत्वात कन्हान, पिपरी, कांद्री मध्ये नागरिकांचा संवाद बैठकीत साधुन वेकोलि निर्मित समस्या सोडविण्याकरिता आंदोलनाच्या नियोजनास नागरिक मोठया प्रमाणात सामोर येत आहे.

यात प्रामुख्याने नरेश बर्वे, किशोर बेलसरे, दिलीप राईकवार, बळवंत पडोळे, अशोक पाटील, कमलेश पांजरे, मोतीराम रहाटे, योगेंद्र रंगारी, गणेश भोंगाडे, मनिष भिवगडे, राजेश यादव, मधुकर नागपुरे, सुत्तम मस्के, रवि रंग, दिनेश नानवटकर, गुंफा तिडके, रेखा टोहणे, प्रदीप वानखे डे, सचिन साळवी, चंद्रशेखर कळमदार, देवा चतुर, बाल्या खंगारे, किशोर अरोरा, बाला भैय्या, ज्ञानेश्वर विघे, शांताराम जळते, विजय पारधी, विनय यादव, रूपेश सातपुते, बंटी हेटे, प्रविण गोडे, नेवालाल पात्रे, प्रशांत मसार, अमोल सुटे, सतिश भसारकर, प्रमोद गि-हे, अशोक खंडाईत, कमलसिंह यादव, नरेश लक्षने, मनेज भोपळे, नागोराव भिवगडे, अशोक मेश्राम, आकाश पंडितकर, संजय हावरे, दिपक तिवाडे सह पिपरी, धरमनगर, अशोक नगर, सुरेश नगर, रायनगर, नाका नं ७, इंदिरा नगर, शिवनगर, हनुमान नगर, गणेश नगर, विवेकानंद नगर, शिवाजी नगर, पटेल नगर, जवाहर नगर, कांद्री परिसरातील नागरिकांनी मोठया संख्येने संवाद बैठकीत वेकोलि व्दारे निर्मित समस्या सोडविण्याकरिता वेकोलि विरोधी जन आंदोलन करण्याची मागणी लावुन धरली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बेलडोंगरी माईन ला प्रकाश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांकडून पथनाट्य सादर

Mon May 6 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – आगामी काळात राजधानी दिल्ली येथे सादरीकरणाची संधी.  कन्हान :- माॅयल लिमिटेड बेलडोंगरी माईन (साटक) येथे ” व्यसनमुक्ती व हिन्दी भाषा बढावा” याविषयावर पथनाट्य सादरीकरण करण्यात आले. यावेळी खान प्रबंधक सी आर एम रेड्डी ,कर्मिक अधिकारी ललीत अरसडे, प्रबंधक रियाज कुरेशी, मनोहर गजभिये , पियुष बागडे यांच्यासह माॅयल कर्मचारी उपस्थित होते. या सादरीकरणात प्रकाश हायस्कूल अँड […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!