– विज वितरण कर्मचाऱ्यांवर नागरीकांचा रोष
रामटेक :- सध्यास्थितीत कधी उन तर कधी पाऊसामुळे वातावरणात दमटपणा राहातो. भरीस भर पावसाळ्यामध्ये डासांचा त्रास व धोका असतो. परीणामस्वरूप गर्मीपासुन तथा डासांपासुन बचावासाठी नागरीक कुलर, पंखे आदींचा चा सहारा घेत असले तरी मात्र मध्येच व वारंवार विज पुरवठा खंडीत होत असल्यामुळे नागरीकांना व विशेषत: चिमुकल्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच पाणिपुरवठा सुद्धा खंडीत होत असल्याने नागरीकांचे कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे विज वितरण विभागाबाबद नागरीक मोठा संताप व्यक्त करीत आहे.
गेल्या काही दिवसांपासुन शहरामध्ये दिवसासह रात्रीला सुद्धा विजेचा लपंडाव सुरु असतो. तर मध्यरात्री मात्र कधी कधी बारा – एक वाजता दरम्यान विद्युत पुरवठा खंडीत होत असतो. यामुळे मात्र विशेषतः चिमुकल्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असतो. त्यांच्या रडण्याने घरील मंडळीसुद्धा कासावीस होत असतात. डासांच्या चावण्याने मोठ्यांचेही हाल बेहाल होत असतात. विजेचे बिल आमच्याकडुन नियमीत वसुल करता तर मग विज पुरवठा सुद्धा नियमीत का देत नाही असा खोचक सवाल नागरीकांनी यावेळी विज वितरण कंपनीच्या स्थानीक अधिकारी कर्मचाऱ्यांना विचारला आहे. एकंदरीत या विजेच्या लपंडावाने नागरीक कमालीचे त्रस्त झालेले असुन विज वितरण कंपनीच्या स्थानिक अधिकारी – कर्मचाऱ्यांबाबद रोष व्यक्त करीत आहे.
विज पुरवठ्या अभावी पाणि पुरवठा खंडीत
गेल्या काही दिवसांपासुन शहरामध्ये विज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार कमालीचे वाढलेले असुन यापासुन आधीच त्रस्त असलेल्या नागरीकांना आता पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. कारण विज पुरवठा खंडीत होत असल्याने शहराला पाणि पुरवठा करणारी पाण्याची टाकी भरत नसल्यामुळे परिणामी शहरवासीयांना पाणिपुरवठा होत नाही. तेव्हा नागरीकांना पाण्यासाठी वनवण भटकावे लागत असते. विहीरीतुन तथा असल्या नसल्यागत स्थितीत असलेल्या हॅन्डपंप वरून पाणी आणावे लागत असते.
लवकरच पाणिपुरवठ्यासाठी विशेष विद्युत जोडणी होणार आहे – बालपांडे
या समस्येबाबद स्थानीक विज वितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता भारत बालपांडे यांना विचारणा केली असता यासर्व समस्या मार्गी लावण्याचा आम्ही पुरेपुर प्रयत्न करीत आहो. तसेच वॉटर फिडर साठी आता विशेष विज वाहिनी टाकण्यात येणार असुन सबस्टेशन पासुन ही वाहिनी निघुन सरळ वॉटर फिडर ला जोडली जाईल व यामुळे शहरवासीयांना पाणिपुरवठा खंडीत होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही असेही बालपांडे यांनी सांगीतले.