मी असमर्थता दर्शवली नाही – रविंद्र भोयर

नागपुर – रविंद्र भोयर यांनी निवडणूक लढवण्यास असमर्थता दाखवल्याचं सांगत काँग्रेसनं अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला आहे. विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना नागपुरात काँग्रेसच्या गोटात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. भोयर यांनी निवडणूक लढवण्यास असमर्थता दाखवल्याचं सांगत काँग्रेसनं अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान, आपण निवडणूक लढवण्यास असमर्थता दर्शवली नसल्याचं भोयर यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय. तसंच देशमुख यांना निवडून आणण्यासाठी काम करणार असल्याचा दावा ही त्यांनी केलाय.

निवडणूक लढवण्यासाठी मी असमर्थता दर्शवली नाही. काँग्रेसकडून काढण्यात आलेल्या पक्षकार मात्र मी असमर्थता दर्शवली असल्याचं म्हटलंय. पण जर काँग्रेसला वाटत असेल की ही निवडणूक रविंद्र भोयर यांच्या नावावर जिंकू शकत नाही. त्यामुळे जर त्यांनी उमेदवार बदलला असेल तर मी त्या निर्णयाचा स्वीकार करतो. मंगेश देशमुख यांच्या विजयासाठी मी जे जे करु शकतो ते या १२ तासात करेन. मात्र, पक्षानं असं का केलं याबाबत प्रदेशाध्यक्षांशी बोलूनच सांगेन, असं रविंद्र भोयर म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

मुख्यमंत्री सहाय्यता मुख्य निधीत जमा 130 कोटी पैकी 31 कोटी खर्च, 99 कोटी शिल्लक

Fri Dec 10 , 2021
 प्रत्येक दिवशी सरासरी 8 नागरिकांना अर्थसहाय्य   वैद्यकीय कारणांसाठी 22 महिन्यात 4932 नागरिकांना 22 कोटींचे अर्थसहाय्य वितरित   नैसर्गिक आपत्ती आणि दुर्घटनांमधील मृतांच्या वारसांना 9 कोटींचे अर्थसहाय्य मुंबई – मुख्यमंत्री सहाय्यता मुख्य निधी ही प्रामुख्याने वैद्यकीय आणि नैसर्गिक आपत्तीच्या दरम्यान जनतेला अर्थसहाय्य करण्यासाठी वापरली जाते पण आजमितीस एकूण जमा 130 कोटी पैकी फक्त 31 कोटी खर्च करण्यात आली असून 99 कोटी रक्कम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com