मुलांनो शिक्षण घेऊन वाघासारखे व्हा – माजी अपर जिल्हाधिकारी चंद्रभान पराते 

नागपूर :- आदिम संशोधन व अध्ययन मंडळ व अस्तित्व क्रियेशन यांच्या माध्यमाने गोळीबार चौक आणि टिमकी येथे लहान मुलांचे व्यक्तिमत्व विकास शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले. या उद्घाटनप्रसंगी माजी अपर जिल्हाधिकारी चंद्रभान पराते म्हणाले कि गरीबांच्या मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण झाली पाहिजे , या हेतूने उन्हाळी शिबिराचे महत्व आहे. हलबा जमातीतील गरीब असलेल्या कुटूंबात मोलमजुरीमुळे शिक्षणाचे महत्व कमी असल्याने या शिबिरातील विद्यार्थींचे व्यक्तिमत्व विकास होते, गरिबांच्या मुलांनी हालअपेष्टा सहन करून उच्च शिक्षण घेतल्यास तो ध्यानी विद्यार्थी वाघासारखा होतो आणि अन्यायाविरोधात गुरगुरतो.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राजकुमार खापेकर यांनी भूषविले. शिबिराचे उद्घाटन डॉ. देवराव नंदनवार यांनी केले. शिबीर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी अपर जिल्हाधिकारी चंद्रभान पराते होते. मंचावर विनायक पराते, प्रा. प्रकाश निमजे, ऍड. सेलूकर, दिलीप खडगी, महेंद्र तारणेकर, डॉ. हेमचंद्र रामटेककर, नारायण भाटघरे, रमेश वडीखाये, विनायक वाघ यांनी त्यांचे विचार व अनुभवांचा सारांश विद्यार्थ्यांच्या समोर मांडून त्यांच्या ज्ञानात भर घातला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदीप पौनीकर, मोरेश्वर पराते, मंजुषा धार्मिक, प्रकाश दुलेवाले, हरेश निमजे,हर्ष धार्मिक, आयुष धापोडकर, पुष्कर बुरडे, रिषभ बुरडे, तुलसी निमजे, आयुष निमजे, यामिनी छप्परघरे यांनी थक परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे संचालन दिपाली नंदनवार आणि शीतल पौनिकर यानी केले तसेच आभार प्रदर्शन प्रियांशी बुरडे हिने केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा - डॉ.पंकज आशिया

Tue Apr 23 , 2024
– दिव्यांगांसाठी केंद्रावर आवश्यक सुविधा यवतमाळ :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत दिव्यांग बांधवांना मतदान करतांना अडचणी येऊ नये यासाठी मतदान केंद्रावर विविध प्रकारच्या सुविधा निर्माण करण्यात येत आहे. प्रत्येक दिव्यांग बांधव, दिव्यांग मतदारांनी येत्या दि.26 एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी केले आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग मतदारांची टक्केवारी वाढण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com