बाल धोरण व कृती आराखडा : सुचना व हरकती आमंत्रित

गडचिरोली :- महिला व बाल विकास विभागांतर्गत बाल धोरणाचा प्रारुप मसुदा तयार करण्यासाठी तज्ञ व्यक्ती व शासनाचे अधिकारी यांचा समावेश असलेली समिती गठित करण्यात आलेली आहे. या गठित समितीने महाराष्ट्र राज्य बाल धोरण व कृती आराखडा २०२२ मसुदा तयार केलेला आहे. सदर प्रस्तावित बाल धोरण व कृती आराखडा २०२२ हा इंग्रजी व मराठी भाषेमध्ये महाराष्ट्र शासनाच्या https://womenchild.maharashtra.gov.in https://www.wcdcommpune.com या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे. तरी सदर प्रस्तावित बाल धोरण हे मुळामध्ये इंग्रजी भाषेमध्ये तयार करण्यात आलेले असुन त्याचे मराठी भाषेमध्ये भाषांतर करण्यात आले आहे. या बाल धोरण व कृती आराखड्यामध्ये आवश्यक बाबी, सूचना, सुधारणा तसेच मराठी भाषेमध्ये भाषांतर करण्यात आलेल्या मसुद्यामध्ये शब्द रचना, व्याकरण या संदर्भाने हरकती व सूचना नागरीकांकडून मागविण्यात येत आहेत.

प्रस्तावित महाराष्ट्र राज्य बाल धोरण व कृती आराखडा २०२२ च्या संदर्भाने नागरीकांच्या हरकती व सूचना दिनांक ३० जून पर्यंत महिला व बाल विकास आयुक्तालय, २०, राणीचा बाग, जुने सर्किट हाऊस जवळ पुणे-०१ या पत्त्यावर अथवा childpolicy@gmail.com या ईमेल वर पाठविण्यात याव्यात, असे आवाहन डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनपात छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन

Fri Jun 7 , 2024
-शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात नागपूर :- महाराष्ट्राचे आराध्यदैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 वा शिवराज्याभिषेकोत्सव दिन सोहळ्यानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात सर्वप्रथम मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राला माल्यार्पण केले. तसेच उपमहापौर कक्षातील शिवराज्याभिषेक सोहळाच्या तैलचित्रास […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com