– सरकारचे पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे अभिनंदन
मुंबई/नागपुर :- मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील राज्य सरकारने आरक्षणात 10 टक्के वाटा देऊन पूर्ण केली. मराठा आरक्षणावर शिंदे सरकारने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी स्वागत केले. मंगळवारी महायुतीच्या राज्य सरकारने विशेष अधिवेशनात विधेयकाला मंजुरी दिल्याने मराठा समाजाला खरा न्याय देण्याचे काम शिंदे सरकारने केल्याचेही जयदीप कवाडे यावेळी म्हणाले.
प्रसिद्धी पत्रकाद्वारे बोलताना जयदीप कवाडे म्हणाले की, गेल्या अनेक सरकारने मराठा समाजाला अंधरात ठेवून त्यांना आरक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम केले. पुरोगामी विचारांची घोंगळी ओढवून शरद पवार सारखे मराठा नेते आजपावतो जे करू शकले नाही ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सरकारने करून दाखविले. मंगळवारी विशेष अधिवेशनात सरकारने मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात दिलेल्या 10 टक्के आरक्षणाचा निर्णय अभूतपूर्व आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण विधेयक आज विधीमंडळाच्या पटलावर ठेवल्यावर सर्वांनाच एकमताने मंजूर करावेच लागले. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता, मराठा समाजाला कायद्यात टिकणारं आरक्षण देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी करून दाखविल्याचेही जयदीप कवाडे यावेळी म्हणाले.
खऱ्या मावळयाकडूनच धाडसी निणर्य घेण्याची क्षमता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्ये आहे. 3 महिन्यांत मराठा आरक्षणाचा तोडगा काढून त्यांनी राज्यातील कोट्यावधी समाज बांधवांच्या संघर्षाचा सन्मान ठेवला. सरकार कोणताही दुजाभाव न करता सर्वाभिमूख निर्णय दिला आहे. महायुती सरकार जे बोलते ते करून दाखविल्यावर आज राज्यातील प्रत्येक मराठा बांधव शिंदे सरकारच्या ऋणी असल्याचेही जयदीप कवाडे यावेळी म्हणाले. पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे सरकारच्या मराठा आरक्षणा संदर्भातील निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.