मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नागपूर भेटीवर

नागपूर :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १ व २डिसेंबर २०२३ रोजी नागपूर भेटीवर येत असून विविध कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुणे येथून १ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथे आगमन होणार आहे. दुपारी १२.१० वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. यानंतर दुपारी १२.४० वाजता शासकीय निवासस्थान रामगिरीकडे प्रयाण करतील.

राष्ट्रपतींच्या हस्ते होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अमृत महोत्सव उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सायंकाळी ५.३० वाजता वर्धा रोडवरील पावनभूमी क्रीडांगण येथे गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टीक सेंटरचे भूमिपुजन होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवे्ंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आदी या कार्यक्रमास उपस्थित राहतील.

सायंकाळी 6.45 वाजता ईश्वर देशमुख शारिरीक महाविद्यालय प्रांगणावर आयोजित खासदार सांस्कृतिक महोत्सवात मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत.

शनिवार, २ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता कविवर्य सुरेश भट सभागृहात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित होणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १११व्या दीक्षांत समारंभात मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत.यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाहून सकाळी ११.४५ वाजता राष्ट्रपतींचे दिल्लीकडे प्रयाण होईल त्यांना निरोप देण्यासाठी विमानतळावर मुख्यमंत्री उपस्थित राहतील. यानंतर दुपारी १२ वाजता विमानतळाहून मुख्यमंत्री शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन दिवसांच्या नागपूर भेटीवर

Fri Dec 1 , 2023
Ø मेडिकलचा अमृत महोत्सव व विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात होणार सहभागी Ø मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री यांचीही उपस्थिती नागपूर :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन दिवसांच्या नागपूर भेटीवर येत आहेत.शुक्रवार १ डिसेंबर रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अमृत महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. तर शनिवार २ डिसेंबर रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरच्या १११ व्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती प्रमुख […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com