मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री लक्ष्मी नृसिंह देवतांचे दर्शन

पुणे :- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर येथे श्री लक्ष्मी नृसिंह देवतांचे दर्शन घेऊन पूजा केली.

यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार विजय शिवतारे, राहुल कुल, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी खासदार रणजितसिंह देशमुख, माजी आमदार राम सातपुते, मुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आदी उपस्थित होते.

प्रदक्षिणावेळी मुख्यमंत्र्यांनी श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर विकास आराखड्यातील कामांच्या प्रगतीची अधिकाऱ्यांकडून व विश्वस्तांकडून माहिती घेतली. मुख्य विश्वस्त ज्ञानेश्वर अरगडे, विश्वस्त अभय कुमार वांकर, डॉ. प्रशांत सुरू यांनी देवस्थान ट्रस्टच्यावतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला. ग्रामस्थांच्यावतीने सरपंच अर्चना सरवदे तसेच सदस्यांनी स्वागत केले.

यावेळी प्रांताधिकारी वैभव नावडकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, तहसीलदार जीवन बनसोडे आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

वढू व तुळापूर बलीदान स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात येईल - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Sun Mar 30 , 2025
– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वढू येथे संभाजी महाराजांच्या समाधीचे पूजन पुणे :- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य प्रेरणा देणारे आहे. पुढील अनेक पिढ्यांना स्फूर्ती आणि ऊर्जा देणाऱ्या त्यांच्या वढू येथील समाधी स्थळ व तुळापूर येथील बलीदान स्थळाला पर्यटन क्षेत्र नव्हे तर तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!