मनपातील विविध संवर्गातील पदोन्नतीस मुख्यमंत्र्यांनी दिली मान्यता

– हिवाळी अधिवेशनात नागपूरसाठी प्रशासकीय दृष्टया महत्वाचा निर्णय : मनपातील ४५ अधिकाऱ्यांना पदोन्नती

नागपूर :- राज्याची उपराजधानी नागपूर शहरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूर शहरासाठी प्रशासकीय दृष्टया महत्वाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. नागपूर महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी राज्य शासनाला प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाला हिरवी झेंडी दाखवित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनपातील ४५ पदांच्या पदोन्नतीला मान्यता दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे नागपूर महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वागत करीत आनंद व्यक्त केला आहे.

राज्य सरकारद्वारे मनपातील पदोन्नतीला मान्यता प्रदान करण्यात आल्यामुळे आता सहायक आयुक्त / वार्ड अधिकारी श्री. गणेश राठोड यांना उपायुक्त पदी तर एकूण नऊ उपअभियंता यांना कार्यकारी अभियंता म्हणून तर ३४ कनिष्ठ अभियंता यांना उपअभियंता म्हणून आणि मुख्याध्यापक (माध्यमिक) साधना सयाम यांना शिक्षणाधिकारी (माध्यमिक) म्हणून पदोन्नती मिळाली आहे.

नगर विकास विभागाच्या १० मे २०२३च्या शासन निर्णयान्वये नागपूर महानगरपालिकेच्या १७९८१ पदांच्या एकत्रित आकृतीबंधास मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमान्वये मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पदोन्नती तपासणी समिती गठीत करण्यात आली. या पदोन्नती तपासणी समितीच्या २४ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित बैठकीमध्ये समितीने पात्र अधिकाऱ्यांस सदर पदांवर पदोन्नती देण्यास शिफारस केली. त्याअनुषंगाने पदोन्नती समितीने शिफारस केलेल्या पात्र अधिकाऱ्यांना प्रशासकीय ठरावानुसार उपायुक्त या पदावर तसेच कार्यकारी अभियंता (स्थापत्य), कार्यकारी अभियंता (यांत्रिकी), उपअभियंता (स्थापत्य), शिक्षणधिकारी (माध्यामिक) या पदांवर पदोन्नती देण्यास राज्य शासनाकडे शिफारस करण्यात आली व या पदांवर संबंधित पात्र अधिकाऱ्यांना तात्पुरती पदोन्नती देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विषयाकडे लक्ष देऊन पदोन्नतीस मान्यता देण्याबाबत निर्देश दिले. त्यानुसार नगर विकास विभागाच्या सह सचिव विद्या हम्पय्या यांनी आदेश जारी केले आहेत.

जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार एक सहायक आयुक्त / वार्ड अधिकारी पदावरील अधिकाऱ्यांना उपायुक्त पदावर, नऊ उपअभियंता यांना कार्यकारी अभियंता पदावर, ३४ कनिष्ठ अभियंता यांना उपअभियंता पदावर आणि एक मुख्याध्यापक (माध्यमिक) यांना शिक्षणाधिकारी (माध्यमिक) या पदावर अशा एकूण ४५ अधिकाऱ्यांना पदोन्नती प्रदान करण्यात आली आहे. बऱ्याच वर्षानंतर अधिकाऱ्यांच्या इतक्या मोठया प्रमाणात झालेल्या पदोन्नतीमुळे मनपात अत्यंत उत्साह व आनंदाचे वातावरण असुन याबाबत मुखमंत्र्यांचे व शासनाचे आभार मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मानले आहे.

 या अधिकाऱ्यांना मिळाली पदोन्नती

१. गणेश राठोड (सहा आयुक्त/ वॉर्ड अधिकारी), पदोन्नती – उपायुक्त

२. व्ही.यु. जुनघरे (उप अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – कार्यकारी अभियंता (स्थापत्य)

३. एन.एस. बोबडे (उप अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – कार्यकारी अभियंता (स्थापत्य)

४. एस. आर. गजभीये (उप अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – कार्यकारी अभियंता (स्थापत्य)

५. प्रविण कोटांगळे (उप अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – कार्यकारी अभियंता (स्थापत्य)

६. प्रशांत सोनकुसळे (उप अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – कार्यकारी अभियंता (स्थापत्य)

७. आर.जे. दुपारे (उप अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – कार्यकारी अभियंता (स्थापत्य)

८. मनोज गद्रे (उप अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – कार्यकारी अभियंता (स्थापत्य)

९. गिरीष लिखार (उप अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – कार्यकारी अभियंता (स्थापत्य)

१०. राजेश गुरमुळे (उप अभियंता (यांत्रिकी)), पदोन्नती – कार्यकारी अभियंता (यांत्रिकी)

११. श्वेता अरूण दांडेकर (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)

१२. वैजयंती विष्णू आडे (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)

१३. अभिजीत यशवंत नेताम (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)

१४. यु.जी. खंडाते (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)

१५. राजू बी. गौतम (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)

१६. रवी झेड मांगे (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)

१७. विजेंद्र व्ही. सहारे (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)

१८.देवेंद्र एम. भोवते (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)

१९. किशोर ए. माथुरकर (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)

२०. विवेक तेलरांधे (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)

२१. जवाहर नायक (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)

२२. प्रशांत एस. वाघमारे (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)

२३. संजय जी. इंगळे (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)

२४. जगदीश एम. बावनकुळे (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)

२५. मनोज एम. रंगारी (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)

२६. संजय गुजर (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)

२७. राहूल ए. देशमुख (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)

२८. प्रमोद जी. मोकाडे (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)

२९. सारंग पींपळकर (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)

३०. गजानन एच. वराडे (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)

३१. ए.आर. मोरे (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)

३२. मनोज संगीडवार (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)

३३. पुष्पा जोगे (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)

३४. नरेंद्र तोटेवार (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)

३५. प्रशांत नेहारे (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)

३६. राजेश वानखेडे (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)

३७. आर.एन. जीवतोडे (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)

३८. संजय पडोळे (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)

३९.  प्रशांत सपाटे (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)

४०. उमेश मदने (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)

४१. प्रदीप सरपाते (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)

४२. दीपक ए. मेश्राम (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)

४३. पुरुषोत्तम फाळके (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)

४४. अभिजीत भुरे (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)

४५. साधना सयाम (मुख्याध्यापक (माध्यमिक)), पदोन्नती – शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनपा व स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांची नगर विकास विभागाचे प्रधान सचिवांनी केली पाहणी

Tue Dec 17 , 2024
नागपूर :- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ के. एच. गोविंद राज यांनी मंगळवारी (ता.१७) नागपूर महानगरपालिका आणि नागपूर स्मार्ट सिटीच्या विविध विकास प्रकल्पांची पाहणी केली. त्यांनी नागपूर स्मार्ट सिटीतर्फे नागपूर पोलीसांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘कमांड कंट्रोल सेंटर’ची सुद्धा पाहणी केली. याप्रसंगी नागपूर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल सूद गोयल, पोलीस उपायुक्त लोहित मतानी, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!