छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श राष्ट्रीय छात्र सैनिकांनी डोळ्यापुढे ठेवावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये राष्ट्रीय छात्र सैनिकांना उत्कृष्ट प्रदर्शन करीत प्रतिष्ठेचे ‘प्रधानमंत्र्यांचे ध्वजनिशाणासह सर्वोत्कृष्ट संचालनालयाचा पुरस्कार पटकावल्याबद्दल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राष्ट्रीय छात्रसेनेचा महाराष्ट्रातील छात्र सैनिकांना आज राजभवन येथे बोलावून कौतुकाची थाप दिली.

दिल्लीतील कडाक्याच्या थंडीत पहाटे उठून रात्री उशिरापर्यंत छात्रसैनिकांनी महिनाभर अथक परिश्रम करुन सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल छात्रसैनिकांचे कौतुक करुन छात्रसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श नेहमी डोळ्यांपुढे ठेवावा, अशी सूचना राज्यपालांनी केली. शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी जीवनकार्य आठवल्यास कुठल्याही आव्हानाला धैर्याने तोंड देता येईल, असेही राज्यपालांनी सांगितले.

छात्रसैनिकांनी परिश्रमासोबतच आयुष्यभर शिस्त पाळावी व चांगले नागरिक होण्याचा प्रयत्न करावा असेही राज्यपालांनी सांगितले.

यावेळी राज्यपालांनी महाराष्ट्राच्या पथकाला मिळालेल्या वैयक्तिक तसेच सांघिक करंडकांची पाहणी केली. तसेच महाराष्ट्राच्या अधिकारी, प्रशिक्षक व छात्रसैनिकांना सन्मानित केले.

कार्यक्रमाला महाराष्ट्र छात्रसैनिकांचे अपर महासंचालक मेजर जनरल योगेंद्र प्रसाद खंडूडी, प्रशिक्षण प्रमुख कर्नल निलेश पाथरकर तसेच प्रजासत्ताक दिन शिबिरात सहभागी झालेले १११ छात्रसैनिक उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या पथकाला मिळालेले सन्मान

• प्रधानमंत्री ट्रॉफी – सर्वश्रेष्ठ विजेता

• सर्वोत्तम निदेशालय प्रधानमंत्री रॅली

• सर्वोत्तम Cadet Sw (Navy)

•सर्वोत्तम निदेशालय( Vayu Sena Competition)

•सर्वोत्तम उद्योजक Naval Unit

•सर्वोत्कृष्ट निदेशालय (G.O.H) RDC Contingent

•सर्वोत्कृष्ट परेड कमांडर (प्रधानमंत्री रॅली )

•आंतर निदेशालय Flag Area competition

• सर्वोत्तम तुकड़ी ( Flying Competition)

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बेस्टमधील कंत्राटी कामगारांच्या कोविड काळातील थकित मानधनाबाबत त्वरित चौकशी करावी - कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे

Fri Feb 3 , 2023
मुंबई : कोविड काळात बेस्टच्या कंत्राटी वाहनचालकांचे आणि कामगारांचे वेतन कंत्राटदाराकडून करण्यात आले नाही. त्याचप्रमाणे कामगारांचे भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी विमा निगमचे हप्ते भरण्यात आले नसल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यामुळे संबंधित यंत्रणेने याबाबत चौकशी करून याचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम (बेस्ट) अंतर्गत कंत्राटी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com