संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी जगाला प्रजासत्ताची शिकवण दिली.महाराजांचे जीवन चरित्र सर्वांसाठी प्रेरणादायी असून पन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये असंख्य पिढ्याना आदर्श ठरणारे शिवरायांचे चरित्र प्रेरणादायी ठरते.बहुजनांच्या कल्याणासाठी झटणारा राजा महाराष्ट्रात निर्माण होणे संपूर्ण देशाचे भाग्य आहे.असे मौलिक मत नागपूर जिल्हा परिषद चे माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी 19 फेब्रुवारीला येरखेडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमात व्यक्त केले.
याप्रसंगी माजी मंत्री व माजी आमदार सुनील केदार व खासदार कृपाल तुमाणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करीत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा देण्यात आला.कामठी तालुक्यातील येरखेडा येथील छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम हे आकर्षणाचे विषय ठरले असून श्री छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समिती येरखेडा-कामठी द्वारे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित दोन दिवसीय कार्यक्रम अंतर्गत ह.भ.प. जनाबाई डोंगरे यांच्या मंडळ द्वारा कीर्तन कार्यक्रम घेण्यात आला तसेच पूजन मिरवणूक,महाप्रसाद इतर कार्यक्रम पार पडले.
दरम्यान कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश भोयर यांनी आपल्या अथक परिश्रमाने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आधारशिला ठेवून येरखेडा वासियांचे स्वप्न पूर्ण करण्यास आपले पाठबळ लावले व ते पूर्ण करून त्यांना शिवरायांना वाहलेली आदरांजली खऱ्या अर्थाने सार्थक ठरल्याचे मौलिक मत माजी मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केले.याप्रसंगी कार्यक्रमाला विशेष पाहुणे म्हणून नागपूर जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्ष मुक्ता कोकुर्डे,शिवसेना(उबाठा) जिल्हाध्यक्ष देवेंद्र गोडबोले,शिवसेना जिल्हा संघटक राधेश्याम हटवार ,युवक कांग्रेस महासचिव अनुराग भोयर, तसेच प्रमुख पाहुने म्हणून कामठी पंचायत समितीच्या सभापती दिशा चनकापुरे,जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले,माजी जी प अध्यक्ष रश्मी बर्वे,पंचायत समिती सदस्य सुमेध रंगारी,माजी सभापती वसंतराव काळे,अनुराधा भोयर,सरपंचगणातील पंकज साबळे,सचिन डांगे,योगीता धांडे, भावना फलके, सारिता रंगारी, तसेच उपसरपंच मंदा महल्ले, राजेश बनसिंगे,किशोर धांडे,बबनराव काळे,ओमबाबू कुरील,काशिनाथ प्रधान,इरसाद शेख,निखिल फलके,आशिष मेश्राम,प्रमोद खोब्रागडे,अमित भोयर,राजकुमार गेडाम,कुसुम खोब्रागडे ,आकाश भोकरे, अनिल पाटील,मो गुरफान, अर्चना सोनेकर,प्रशांत काळे,निर्मल वानखेडे,प्रवीण भायदे, दीपक पांडे,सुनील लक्कवार, सारंग चौधरी,अतुल सलाम,चेतन लक्षणे, शुभम महल्ले, गौरव कराळे, यश महल्ले,सुशील धांडे,सुरेश राऊत,आकाश गंदेवार,आदीं उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला असून या कार्यक्रमात मोठ्या संख्येने जनसमूह व महिलागण सहभागी झाल्या होत्या.