संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयाच्या इतिहास विभागातर्फे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण, दीपप्रज्वलन व महाराष्ट्र राज्य गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे समन्वयक व इतिहास विभाग प्रमुख डॉ.जितेंद्र सावजी तागडे यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करतांना छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य तत्कालीन साम्राज्यापेक्षा श्रेष्ठ असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.शरद अमृतराव निंबाळकर, माजी कुलगुरू डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकतांना त्यांच्या सैन्यात सर्व पंथ, जाती, धर्माचे सैनिक असल्याने ती एक राष्ट्रीय सेना होती असे मत मांडले. प्रमुख वक्ते डॉ. अफरोज हनिफ शेख, प्राध्यापक व विभागप्रमुख एस. बी. सिटी महाविद्यालय, नागपुर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वापासून सद्यास्थितीत विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी असा सल्ला दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विनय चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मनिरपेक्ष व सहिष्णुतेचे धोरण अंगीकारण्याचे आवाहन केले. यावेळी तुषार कोडवदे यांनी शिवगर्जना तर पायल मेश्राम यांनी गीतातून जाणता राजास अभिवादन केले. सौरभ सौलंकी, रुचिका भस्मे, सृष्टी वाडिभस्मे, स्मिता बंदुले यांनीही मनोगत व्यक्त केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.मनिष चक्रवती, उपप्राचार्य डॉ.रेणू तिवारी, डॉ.संजीव शिरपूरकर, डॉ.यशवंत मेश्राम, डॉ.सिद्धार्थ मेश्राम, डॉ.दीपक भवसागर, डॉ.तुषार चौधरी, डॉ. विनोद शेंडे., डॉ. शालिनी चहांदे, ग्रंथपाल शिल्पा हिरेखन, डॉ. किशोर ढोले, डॉ. समृद्धी टापरे, डॉ. विकास कामडी, भीमराव राठोड, सीमा पाटील, प्रवीण अंबादे व मोठ्या संख्येने इतिहास विषयाचे विद्यार्थी व एन.सी.सी. चे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ. महेश जोगी यांनी तर आभार कँप्टन प्राध्यापक मोहम्मद असरार यांनी मानले.