नागपूर :-भारत राष्ट्र समितिचे राष्ट्रीय अध्यक्ष के. चंद्रशेखरराव तसेच तेलगंणा चे मुख्यमंत्री यांच्या हस्ते चरण वाघमारे यांना पुर्व विदर्भ समन्वयक म्हणून पदोन्नती देण्यात आली. त्याकरीता चरण वाघमारे हे आपले पदभार सांभाळण्या करीता 29 जुलै 2023 रोजी भारत राष्ट्र समितिचे विदर्भीय कार्यालयात नवनिर्वाचित झाल्यानंतर प्रथम आगमन केलं. यावेळी भारत राष्ट्र समिति महाराष्ट्र युवा नेते प्रेम (हितेश) मुंदाफळे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. चरण वाघमारे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.