सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या ८६ प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :-नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. गुरुवार (ता. २०) रोजी शोध पथकाने ८६ प्रकरणांची नोंद करून ४२ हजार ५०० रुपयाचा दंड वसूल केला आहे.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी हातगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत २५ प्रकरणांची नोंद करून १०००० रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 6 प्रकरणांची नोंद करून 600 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत ६ प्रकरणांची नोंद करून रु २४०० दंड वसूल करण्यात आलेला आहे. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डिंगचे हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 2000/- दंड) या अंतर्गत २ प्रकरणांची नोंद करून रु ४००० दंड वसूल करण्यात आलेला आहे.

वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद या अंतर्गत ६ प्रकरणांची नोंद करून रु ८५०० दंड वसूल करण्यात आला. या व्यतिरिक्त इतर ३० व्यक्तिविरुध्द प्रकरणांची नोंद करून ६००० रुपयेचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव करणा-या संस्थांकडून ११ प्रकरणांमध्ये ११००० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.

मनपा आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी यांचा मार्गदर्शनात उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांचा नेतृत्वात उपद्रव शोध पथकाचे लक्ष्मीनगर झोनचे प्रमुख संजय खंडारे, धरमपेठ झोनचे धर्मराज कटरे , हनुमान नगर झोनचे पवन डोंगरे, धंतोली झोनचे संदीप सरदार, नेहरूनगर झोनचे नत्थू खांडेकर, गांधीबाग झोनचे सुशील तुपते, सतरंजीपूरा झोनचे प्रेमदास तारवटकर, लकडगंज झोनचे धनराज कावळे, आशीनगर झोनचे संजय सोनोने आणि मंगळवारी झोनचे नरेंद्र तुरकर यांनी आपल्या जवान सोबत कारवाई केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

युवकांनी नाविन्यपूर्ण संशोधनासाठी पुढाकार घ्यावा – सौम्या शर्मा

Fri Apr 21 , 2023
 – जागतिक नाविन्यता दिनानिमित्त नाविन्यता, उद्योजकतेच्या विविध उपक्रमांचे उद्घाटन नागपूर :- आरोग्य, शिक्षण, ग्रामीण विकास, पायाभूत सुविधा आदी क्षेत्रात नाविन्यपूर्ण संशोधनाद्वारे समस्यांवर तोडगा काढण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी आज येथे केले. जागतिक नाविन्यतादिनाच्या औचित्याने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राच्यावतीने आयोजित कार्यक्रमात शर्मा बोलत होत्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com