केंद्र सरकारच्या विविध योजनांतून नागरिकांच्या जीवनात बदल

– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जनतेशी संवाद

– दयानंद पार्क येथे विकसीत भारत संकल्प यात्रा

नागपूर :- केंद्र सरकारच्या विविध योजनांमुळे नागरिकांच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल झाले आहेत. विकसीत भारत संकल्प यात्रा केंद्र शासनाच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच त्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यात महत्वाची भूमिका निभावत आहे, असे प्रतिपादन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

केंद्र शासन पुरस्कृत तसेच राज्य शासनाच्या योजनांची नागरिक, विद्यार्थी, महिला, कामगार व इतर गरजू घटकांना माहिती व्हावी यासाठी देशभरात 15 नोव्हेंबर 2023 पासून ‘विकसित भारत संकल्प यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे या यात्रेसाठी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत केंद्रीय योजनांमुळे भारतीयांना होत असलेल्या लाभाची माहिती दिली.

नागपूर महानगरपालिकेद्वारे मंगळवारी झोन अंतर्गत जरीपटका येथील दयानंद पार्क येथे विकसीत भारत संकल्प यात्रा चे आयोजन करण्यात आले होते. विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान मोदी यांनी साधलेल्या संवाद ऐकण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने, उपायुक्त रवींद्र भेलावे, उपायुक्त सुरेश बगळे, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, माजी नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, समाज विकास अधिकारी डॉ. रंजना लाडे, कार्यकारी अभियंता सुनील उईके, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, डॉ. विंकी रुघवानी, माजी नगरसेवक महेंद्र धनविजय, माजी नगरसेविका प्रमिला मथरानी, माजी नगरसेवक प्रभाकर येवले, विजय केवलरामाणी, मंगळवारी झोनचे झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अतिक खान, उपअभियंता कन्हैया राठोड, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे स्वप्नील लोखंडे, बंडू पारवे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

दयानंद पार्क येथे उज्ज्वला गॅस योजना, पीएम स्वनिधी, आरोग्य तपासणी, सिकलसेल तपासणी, क्षयरोग स्क्रीनिंग, अमृत योजना, आधार अपडेशन, आयुष्मान भारत योजना या योजनांचा नागरिकांनी मोठ्या संख्येत लाभ घेतला.

कार्यक्रमात मनपाचे जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी उपस्थितांना विकसीत भारतची शपथ दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पॅरा खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा - तिरंदाजी : मुंबईच्या आदिल अन्सारीने भेदले सुवर्णपदकाचे लक्ष्य

Sun Dec 17 , 2023
– डावपेच यशस्वी ठरल्याने चॅम्पियन : आदिल नवी दिल्ली :- क्रीडा मंत्रालय आणि साई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या पॅरा खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची थकलेली सुवर्ण पदकाची प्रतिक्षा शनिवारी तिरंदाज आदिल अन्सारीने पूर्ण केली. पॅरा तिरंदाजी सर्वात कठिण समजल्या जाणाऱ्या पॅरा तिरंदाजीतील डब्लू १ प्रकारात आदिलने आपलाच आंतरराष्ट्रीय संघ सहकारी नवीन दलालचा १३२-१०० असा सहज पराभव केला. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com