चंद्रपूर महानगरात पाच महिन्यात पाच हजार 443 नवजात बालकांचा जन्म

चंद्रपूर : महानगरपालिका हद्दीत मागील पाच महिन्यात पाच हजार 443 नवजात बालकांचा जन्म झाल्याचा अहवाल चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभेत सादर करण्यात आला.

29 नोव्हेंबर रोजी चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या प्रशासकीय इमारतीत महिला व बालकल्याण समिती सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती पुष्पाताई उराडे व उपसभापती शितल कुलमेथे यांच्यासह समिती सदस्यांची उपस्थिती होती.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेनुसार महानगरपालिकेच्या प्रत्येक महिला व बालकल्याण समितीच्या सभेमध्ये स्त्रीभ्रूणहत्या तसेच मुला मुलींच्या जन्माचे गुणोत्तर प्रमाण किती आहे, याबाबत अहवाल सादर करण्यात येतो. यावेळी मे 2021 ते सप्टेंबर 2021 या पाच महिन्याची जन्माची आकडेवारी सादर करण्यात आली. यात एकूण 2660 मुली तर 2783 मुले असे एकूण पाच हजार 443 नवजात बालकांचा जन्म झाला आहे. बैठकीला शहरातील तिन्ही झोनचे सहायक आयुक्त यांची उपस्थिती होती.
—————
चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूर

मुला- मुलींची जन्मसंख्या
(मे २०२१ ते सप्टेंबर २०२१)

महिना——- मुली————मुले————एकूण
मे———— ४१४———–४५६———— ८७०
जून———–४४८———–४६७———- ९५१
जुलै———–४५९———–४५७————९१६
ऑगस्ट——  ६११———–६६६———— १२७७
सप्टेंबर——– ६९२———-७३७———— १४२९
—————२२६०———२७८३———-५५४३

(गुणोत्तर प्रमाण – सरासरी एक हजार मुलांमागे ८१२ मुली) 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

कॅन्सरग्रस्त निराधार म्हातारीने शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून केली जीवन यात्रा संपवण्याची याचना

Mon Nov 29 , 2021
हृदय पिळवुन टाकणारी व माणुसकीला काळीमा फासणारी घटना  कुही – इंदिराबाई हटवार ८० वर्षीय वृध्द महिला पाचगाव येथील रहीवासी आहे . या म्हातारीला कर्करोगासारखा गंभिर आजार झाला असुन अतिशय भयावह परिस्थितीमध्ये तीचा मुत्युशी संघर्ष सुरु आहे . तिने आपली संपत्ती मुलाच्या नावे केल्यानंतर मुलांनी तिला वाऱ्यावर सोडुन दिले . व तिची देखभाल करण्यास स्पष्ट नकार दिला . या म्हातारीची शारीरिक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!