नागपूर :- क्रिडा विकास संस्था (slum soccer ) आयोजित श्री. वा. धाबे स्मुर्ती झोपड़पट्टी फुटबॉल प्रतियोगिता कामगार नगर मुन्सिपल स्कूल ग्राउंड येथे झालेल्या स्पर्धेत कामगार नगर संघाने अजिंक्य राहण्याचा मान मिळविला . स्पर्धेच्या अंतिम लढतीत रमाई नगर संघाला पराभूत करीत पेनल्टी शूट मध्ये कामगार नगर संघाने हे यश प्राप्त केले . स्पर्धेत अंतिम फेरीत कामगार नगर संघाने रमाई नगर संघाला पेनल्टी शूट मध्ये 2 – 1 अशा गोलने पराभूत केले .दोन्ही संघाच्या खेळाडूंनी एकमेकांशी भिडत गोल नोंदविण्याचा प्रयत्न केला. परंतु शेवट पर्यंत दोन्ही संघाकडून गोल करण्यात आले नाही शेवटी पेनल्टी शूट करीत कामगार नगर संघाने 2 – 1 अशी आघाडी मिळवली. शेवटी रमाई नगर संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले . या आधी यामध्ये एकूण 16 संघांनी सहभाग घेतला.जाधव ( पो. नि.कपिल नगर ), प्रदीप भैसे (पो . कपिल नगर ) यांच्या उपस्तित विजयी संघाला चषक देऊन सन्मानित करण्यात आले सोबत रोश अली अन्सारी, शारुख सुलतान, सोनू अन्सारी , विक्की भाई होते . स्पर्धा यशस्वीतेसाठी शहरयार अली, उमेश देशमुख, पंकज महाजन, अन्सार अन्सारी, विकास मेश्राम, कामिल अन्सारी, मूनमून यादव , शिबा मारकस , शिवानी चौधरी व बादल सोरन यांनी परिश्रम घेतले.
पेनल्टी शूट मध्ये कामगार नगर संघा कडून मुसीस अन्सारी १ गोल , व अक़ुब जावेद १ गोल, केला. रमाई नगर संघा कडून अक्रम खान १ गोल केला .