राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष नागपूर विभागाच्या दौऱ्यावर, 19 जूनपासून आढावा व जनसुनावणी घेणार

नागपूर :- राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे 18 ते 24 जून 2023 दरम्यान नागपूर विभागाच्या दौऱ्यावर येत आहेत. उद्या, रविवार दि. 18 जून रोजी त्यांचे नागपुरात आगमन होणार आहे. तर 19 जूनपासून ते आढावा व जनसुनावणी घेणार आहेत.

नागपूर येथे 19 जून रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष निधी अंतर्गत मागील तीन वर्षात राबविलेल्या विविध योजना व त्यावरील खर्चाचा आढावा घेण्यात येणार आहे. यासोबतच विभागातील सर्व जिल्हा परिषदा, महानगर पालिका यांच्याद्वारे राबविण्यात येत असलेल्या योजनांचाही आढावा घेण्यात येणार आहे. महानगर पालिका आयुक्त आणि महाज्योती नागपूर यांच्यासोबत आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य विविध विषयांवर चर्चा करणार व योजनांचा आढावा घेणार आहेत.

विभागीय आयुक्त कार्यालयात 20 जून रोजी राज्य मागासवर्ग आयोगासमोर जनसुनावणी होणार आहे. यानंतर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपूर आणि भंडारा यांच्याशी आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य चर्चा करतील. उभय जिल्ह्यांच्या सर्व जात प्रमाणपत्र निर्गमन अधिकाऱ्यांसोबत चर्चा व आढावा बैठकही होणार आहे. 20 जून रोजी सायंकाळी आयोगाचे अध्यक्ष व सदस्य गोंदिया जिल्ह्याकडे प्रयाण करतील. 21 ते 24 जून पर्यंत आयोगाचा गोंदिया,गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

115 AGNIVEERS ATTESTED AT GUARDS REGIMENTAL CENTRE, KAMPTEE

Sat Jun 17 , 2023
Nagpur :- The maiden Agniveer Course at the Brigade of the Guards Regimental Centre, Kamptee was attested on 17th June 2023. The historic event involved Agniveer taking the solemn oath to protect the motherland at all costs. A total of 115 Recruits were attested under Batch 1of Agniveers. The event was witnessed by near & dear ones of the Agniveers […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com