हरदास नगरात दिवसाढवळ्या वृद्ध महिलेची चैन स्नेचिंग

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या हमालपुरा येथे मोलमजुरी करून घरी परत येत असलेल्या 60 वर्षीय रेखा बोरकर नामक महिलेची दिवसाढवळ्या सोनसाखळी हिसकावून पळ काढल्याची घटना मागील महिन्यात 21 एप्रिल ला घडली असता यातील आरोपीचा शोध घेण्यात जुनी कामठी पोलिसांना अजूनही यशप्राप्त झाले नसून या घटनेला विराम मिळत नाही तोच या घटनास्थळाच्या कडेला असलेल्या हरदास नगर येथे सुनील चहांदे यांच्या कुटुंबात आयोजित लग्न समारंभात सहभागी व्हायला आलेल्या एका 74 वर्षोय वृद्ध महिलेची हरदास नगरच्या विहार समोर दीड तोळ्याची सोनसाखळी एका 25 वर्षीय अज्ञात तरुणाने हिसकावून पळ काढल्याची घटना काल 13 मे ला सायंकाळी साडे पाच घडली असून यासंदर्भात पीडित फिर्यादी 74 वर्षीय महिला शोभा गणवीर रा. वरठी भंडारा ने जुनी कामठी पोलीस स्टेशन ला तक्रार नोंदविली असून पुढील तपास सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच जुनी कामठी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जुमडे यांनी पोलीस कर्मचाऱ्यासह घटनास्थळ गाठून सीसीटीव्ही फुटेज तपासणी करून सीसीटीव्ही केमेऱ्यात कैद झालेल्या आरोपीचा शोध घेणे सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

Tue May 14 , 2024
मुंबई :- छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रवींद्र पेठकर, कक्ष अधिकारी घनश्याम जाधव, विजय शिंदे आदीसह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. Follow us on Social […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com