३८ आरोग्य शिबिरांद्वारे ३४२५ महिलांची आरोग्य तपासणी  “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियान

चंद्रपूर :- “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियान अंतर्गत ३४२५ महिलांची तपासणी आरोग्य शिबिरांत करण्यात आली असुन मनपा आरोग्य विभागाद्वारे सातत्याने आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जात आहे. महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत नवरात्र उत्सवानिमित्त ” माता सुरक्षित तर घर सुरक्षित ” अभियान दि. २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर पर्यंत राबविले जात असुन याअंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ३८ आरोग्य शिबिरे घेण्यात आली असुन एकूण ३४२५ महिलांची मोफत आरोग्य तपासणी यात केली गेली आहे.

चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील १८ वर्षावरील महिला, माता, गरोदर स्त्रिया यांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी सदर अभियान राबविले जात असुन यात तरूणी, महिला व गरोदर महिलांची स्त्रीरोगतज्ञासह रेडिओलॉजिस्ट, सर्जन, फिजिशियन, त्वचा व अस्थिरोगतज्ञ. दंतरोग आदी विविध तज्ञ डॉक्टरांतर्फे तपासणी करून उपचार केले जात आहेत.

रक्त, लघवी, सोनोग्राफी, क्ष किरण तपासणी आदी सर्व तपासण्या देखील मोफत केल्या जात आहेत. तसेच आवश्यक असल्यास शस्त्रक्रिया सुद्धा केली जाणार आहे. आरोग्य तपासणीसह तरूणी व महिलांना साथरोग, गर्भधारणापुर्वीची काळजी, सकस आहार, कुटूंब कल्याण कार्यक्रम, आभा कार्ड नोंदणी आदींचे मार्गदर्शन देखील वैद्यकिय अधिकार्‍यांतर्फे केले जात असुन अधिकाधिक महिलांनी या मोफत शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.       

समुपदेशनासह पोषण संदर्भात योग्य मार्गदर्शनाची व्यवस्था

या मोफत आरोग्य तपासणी शिबिरांमध्ये विविध विषयांवर समुपदेशन केल्या जात आहे. तसेच तज्ञांमार्फत कुटुंब नियोजन, पोषण, स्तनपान, अति जोखमीच्या प्रसुतीकरीता योग्य मार्गदर्शन व समुपदेशन आणि तपासणी या शिबिरामध्ये केल्या जात आहे. सोबतच गरोदर आणि प्रसूत व स्तनदा मातांसाठी रुचकर पण पौष्टिक अशा आहारासंबंधी मार्गदर्शन सुद्धा केले जात आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com