संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नागपूर विभागातील एस टी कामगार महामंडळाच्या प्रशासन विभागामुळे मागील 33 वर्षांपासून होत असलेल्या अन्यायामुळे त्रस्त झालेल्या पीडित सेवानिवृत्त एस टी कामगारांनी साखळी उपोषण पुकारले आहे.
हे साखळी उपोषण उच्च न्यायालयाने 180 दिवसांचे प्रकरण निकाली निघाले असून त्यांची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी ,उच्च न्यायालयाचा निकाला विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा,सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची उपदान व रजा रोखीकरनाची संपूर्ण थकबाकी त्वरित अदा करण्यात यावी या मागण्यासाठी साखळी उपोषण पुकारण्यात आले आहे.या साखळी उपोषणात निशिकांत धोंडसे,जयभारत नवनागे,ए एच हैदरी,यशवंत द्याग्रेकर,ज्ञानेश्वर आगरेकर, किशोर मस्के,अरुण चकोले,रमेश फुलझेले, मोहन मुजुमदार,अरुण भागवत आदींचा समावेश आहे.