जनगणना संचालनालय संचालक डॉ. निरुपमा डांगे यांची धंतोली झोन कार्यालयाला भेट

– मनपाद्वारे कार्यान्वित सीआरएस संगणक प्रणालीच्या कार्यपद्धतीची केली प्रशंसा 

नागपूर :- मुंबई येथील जनगणना संचालनालयाच्या संचालिका डॉ. निरुपमा डांगे (भाप्रसे) यांनी नुकतीच नागपूर महानगरपालिकेच्या धंतोली झोन कार्यालयाला भेट देत नागपूर महानगरपालिका अंतर्गत जन्म-मृत्यू नोंदणी व प्रमाणपत्राकरिता वापरण्यात येत असलेली CRS (Civil Registration System) संगणक प्रणालीच्या कार्यपद्धतीची माहिती जाणून घेतली. तसेच मनपाद्वारे CRS प्रणालीच्या कार्यपद्धती बद्दल समाधान व्यक्त करीत कार्याची प्रशंसा केली.

याप्रसंगी जनगणना संचालनालयचे सहायक संचालक प्रवीण भगत, डीपीए संजीव गावकर मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा निबंधक (जन्म-मृत्यु) डॉ. नरेंद्र बहिरवार, सांख्यिकी अधिकारी (जन्म-मृत्यु) डॉ. रंजना लाडे, सहायक आयुक्त विजय हुमने, झोनल वैद्यकीय अधिकारी तथा उप. निबंधक (जन्म-मृत्यु) डॉ. अतिकुर रहेमान खान, प्र. सांख्यिकी सहायक (जन्म-मृत्यु) मुकेश शंभरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाचे सांख्यिकी अधिकारी देवराव देलमाडे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

भेटीदरम्यान सर्वप्रथम मा. डॉ. निरुपमा डांगे(भाप्रसे) यांचे सांख्यिकी अधिकारी (जन्म-मृत्यु) डॉ. रंजना लाडे यांनी पुष्पगुच्छ व शाल देवून स्वागत केले, तसेच सहायक संचालक प्रवीण भगत यांचे आरोग्य अधिकारी तथा निबंधक (जन्म-मृत्यु) डॉ. नरेंद्र बहीरवार यांनी पुष्पगुच्छ व शाल देवून स्वागत केले व भेटी संबंधातील कार्यवाहीस सुरुवात करण्यात आली.

भेटी दरम्यान मा. डॉ. निरुपमा डांगे यांनी जन्म-मृत्यु विभागाचे अभिलेख, मासिक व वार्षिक अहवाल, मृत्यु कारणांचे अहवाल, इत्यादी बाबत तपासणी केली. तसेच मनपा अंतर्गत जन्म-मृत्यु दाखल्याकरिता वापरण्यात येत असलेल्या CRS संगणक प्रणालीची व विभागाच्या कार्यपध्दीची प्रत्यक्षपणे पाहणी केली व झोन मध्ये उपलब्ध अर्जदार (नागरिक) यांचेशी चर्चा करुन अर्जदाराच्या मृत्यु प्रमाणपत्राच्या मागणी अर्जान्वये स्वत: अर्जदारास मृत्यु प्रमाणपत्राची प्रत प्रदान केली. या CRS प्रणालीचा वापर संपूर्ण देशाअंतर्गत करण्यात येत आहे. यामुळे भारतात होणा-या संपूर्ण जन्म व मृत्युच्या नोंदणीची आकडेवारीची नोंद होते. तसेच मृत्यु घटनांच्या नोंदी संबंधाने मृत्यु कारणांचे वैद्यकीय प्रमाणीकरणामुळे मृत्यु घटनांच्या नोंदणी मध्ये नेमके कुठल्या आजारामुळे जास्त मृत्युच्या नोंदी होत आहेत याची शहनिशा करुन त्यावर प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे, इत्यादी बाबीं करणे शक्य होणार आहे. 

मनपा अंतर्गत सन २०१६ पासून या CRS प्रणालीचा वापर सुरु असून या प्रणाली अंतर्गत १०० टक्के जन्म व मृत्युच्या नोंदणी होत आहेत व या जन्म-मृत्यु विभागात वापरण्यात येत असलेल्या CRS संगणक प्रणालीच्या कार्यपध्दतीवर मा. संचालक मा. डॉ. निरुपमा डांगे यांनी समाधान व्यक्त करुन प्रशंसा केली.

मनपाच्या धंतोली झोनच्या भेटी नंतर मा. डॉ. निरुपमा डांगे व संबंधीत संपूर्ण चमूसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडीकल) येथे भेट दिली व भेटी दरम्यान शासकीय मेडीकल रुग्णालयात होणा-या प्रत्येक जन्म व मृत्यु घटनांच्या नोंदी विहीत मुदतीच (२१ दिवसाचे आत) CRS प्रणाली अंतर्गत होणे बंधनकारक आहे, असे सुचित केले. तसेच मृत्यु कारणांचा मासिक अहवाल न चुकता शासनास पाठविण्याचे निर्देशही दिलेत. त्यानंतर संबंधीत संपूर्ण चमू डॉ. चैतन्य शेंबेकर यांचे खाजगी दवाखाना ओमेगा हॉस्पिटल देखील भेट दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय क्षेत्रात आगामी काळात विविध संधी - राज्यपाल रमेश बैस

Tue Feb 13 , 2024
मुंबई :- देशात इंद्रधनुष्याप्रमाणे कृषी क्षेत्रात हरित क्रांती, दुग्ध उत्पादनात श्वेत क्रांती, डाळींच्या उत्पादनात पित क्रांती, मत्स्य उत्पादनात नील तर मांस उत्पादनात लाल क्रांती झाली. आगामी काळात पशुपालन, मत्स्य शेती व दुग्धव्यवसाय हे क्षेत्र गुंतवणुकीसाठी आकर्षक होणार असून या क्षेत्रात गुंतवणूक, उद्योग व रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी केले. राज्यपाल रमेश बैस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com