कामगारनगर येथील कब्रस्तानचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

नागरिकांना मुलभूत सुविधा प्राधान्याने पुरवाव्यात – डॉ. नितीन राऊत

 नागपूर, दि. 30 : नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी शासन कटीबध्द असून स्थानिक प्रशासनाने त्या प्रथम प्राधान्याने पुरवाव्यात, अशा सूचना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिल्या. प्रभागाच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींनी नागरी सुविधांची कामे पूर्ण होण्यासाठी संबंधित यंत्रणांशी वेळोवेळी पाठपुरावा करावा, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

            कामगार नगर येथील मुस्लिम कब्रस्तानचे प्रवेशव्दार व सौंदर्यीकरण कामाचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते कोणशिलेचे अणावरण करुन रविवारी (दि.30 जानेवारी) लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.  प्रभागाचे नगरसेवक दिनेश यादव, अल्पसंख्याक पदाधिकारी अकील अहमद अफसर, मुस्लिम कब्रस्तान कमेटीचे अध्यक्ष आलमगीर अंसारी यांच्यासह परिसरातील नागरिक आदी यावेळी उपस्थित होते.

            सामान्य नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी राज्य शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. ग्रामीण क्षेत्रात मुलभूत  सुविधा उभारण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना, विशेष घटक योजना, आदिवासी उपयोजनांतून विकास निधी उपलब्ध होतो. तसेच शहरी भागात संबंधित नगरपालिका, महानगरपालिकाव्दारे नागरी सुविधा उभारण्यात येतात, असे श्री. राऊत यांनी यावेळी सांगितले.

            प्रभागाच्या मागणीनुसार संबंधित प्रभागात तसेच क्षेत्रात रस्ते बांधकाम, शौचालय, शाळा, अंगणवाडी, रुग्णालय बांधकाम तसेच स्मशानभूमी व मुस्लिम बांधवांसाठी कब्रस्तान आदी विकास कामे संबंधित यंत्रणांव्दारे निर्माण करण्यात येते. नागरिकांच्या सोयी-सुविधा पुरविण्यासाठी राज्य शासन कटीबध्द असून त्यासाठी निधी तरतूद उपलब्ध करुन दिली जाईल, असे आश्वासनही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. याप्रसंगी परिसरातील कामगार बांधवांना पालकमंत्र्यांच्या हस्ते ई-श्रम कार्डचे वितरणही करण्यात आले

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

महात्मा गांधी आणि त्यांचे विचार अमर आहेत त्या विचारांवर चालण्यासाठी दृढसंकल्प होऊया - उपमुख्यमंत्री अजित पवार

Sun Jan 30 , 2022
-हुतात्मा दिनानिमित्त शहीद वीरांना उपमुख्यमंत्र्यांची विनम्र आदरांजली मुंबई, दि. 30 :- “राष्ट्रपिता महात्मा गांधीं ही व्यक्ती नसून विश्वशांती, मानवकल्याणाचा महान विचार आहे. गांधीजींनी  सत्य, अहिंसा, शांततेच्या  मार्गानं देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. या मुल्यांचे महत्त्व जगाला समजावून सांगितले. समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या हक्काचा लढा लढला. साधी राहणी, उच्च विचारांचा आदर्श प्रस्थापित केला. मानवतेच्या कल्याणात विश्वाचं कल्याण आहे, ही शिकवण दिली. खेडी स्वयंपूर्ण झाली तरंच देश स्वयंपूर्ण होईल हा त्यांचा विश्वास […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com