राजधानीत लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी

नवी दिल्ली :- भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची 168 वी जयंती महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरी करण्यात आली.

कॉपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा अपर प्रधान सचिव रूपिंदर सिंग यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अपर निवासी आयुक्त नीवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी- कर्मचाऱ्‍यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 

महाराष्ट्र परिचय केंद्रात लोकमान्य टिळक यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वीज बिलाविरोधी मोर्चेकरी ग्राहकांच्या तक्रारींचे जागीच निवारण

Tue Jul 23 , 2024
नागपूर :- युवक कॉग्रेसतर्फे सोमवारी (दि. 22) रोजी विजदर वाढीच्या विरोधात महाल विभाग व तुळशीबाग उपविभाग येथे आलेल्या मोर्चात सहभागी असलेल्या ग्रहाकांपैकी एकुण 17 ग्राहकांच्या विज बिलाबाबतच्या तक्रारींची दखल घेत त्या तक्रारींचे जागीच निवारण करण्यात आले आहे. तक्रारकर्ता सर्व ग्राहकांची वीजबिले तुळशीबाग उपविभागामार्फत तपासून त्याची माहिती देखिल संबंधीत ग्राहकांना देण्यात आली आहे. यात प्रामुख्याने रीडिंग अनुसार (फोटो प्रमाणे) बिल योग्य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!