संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- आज 10 व्या जागतिक आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय कामठी, उपजिल्हा रुग्णालय कामठी, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, कामठी यांच्या संयुक्त विद्यमाने नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र नगरपरिषद च्या प्रांगणात जागतिक योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
आज धावपळीच्या युगात स्वतःकडे लक्ष द्यायला अनेकांना वेळ नाही, पण या व्यस्ततेतूनही वेळ काढून योग केल्यास शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते. सर्व शारीरिक आणि मानसिक आजारांना शरीरापासून दूर ठेवण्यासोबत योगाचा प्रत्येकाच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडतो असे प्रतिपादन कामठी पंचायत समिती सभापती .दिशा चनकापुरे यांनी केले.
योग संस्काराचे महत्त्व जाणून *”योग स्वतःसाठी आणि समाजासाठी” या टँग लाईन खाली जागतिक १० वा आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त प्रात्यक्षिक योगासने केली.
योगा प्रशिक्षक डाँ. रश्मी शेंन्डे यांनी उपस्थितांना योग प्रशिक्षणाचे धडे देवुन स्वस्थ राहण्याचा कानमंत्र दिला.
याप्रसंगी पंचायत समिती कामठी सभापती दिशा चनकापुरे, उपजिल्हा रुग्णालय कामठी येथिल वैद्यकीय अधिक्षिका . डाँ. निशांत शेख, तालुका आरोग्य अधिकारी .डाँ. सुरेश मोटे , डाँ.प्रशांत डांगोरे, आरोग्य सहाय्यक.धिरेंद्रकुमार सोमकुवर, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी डाँ. शबनम खाणुनी, पब्लिक हेल्थ मँनेजर डाँ. सबा खान, योगा प्रशिक्षक डाँ. रश्मी शेंन्डे तसेच ईतर कर्मचारी वर्ग व आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.